Tahawwur Hussain Rana : पाकिस्तानात जन्मला, कॅनडात वसला; डॉक्टर दहशतवादी कसा बनला?

Tahawwur Hussain Rana : पाकिस्तानात जन्मला, कॅनडात वसला; डॉक्टर दहशतवादी कसा बनला?

Tahawwur Hussain Rana : जगाला हादरुन सोडणारी घटना 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत घडली. ही घटना होती आहे 26/11 (Mumbai Attack) च्या दहशतवादी हल्ल्याची. या हल्ल्यात शेकडो निरपराध लोकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच आता हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर हुसैन राणाला (Tahawwur Hussain Rana) आज भारतात आणण्यात येतंय. तहव्वूर हुसैन राणा एक डॉक्टर होता पण नागरिकांचा इलाज करता करता तो कसाईचं बनला. हा तहव्वूर हुसैन राणा नेमका होता कोण, त्याचा 26/11 हल्ल्याशी काय कनेक्शन होतं, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..

साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरातांचे साटंलोटं, निवडणूक बिनविरोध…केवळ घोषणा बाकी

तहव्वूर राणा हा पाकिस्तानी नागरिक असून तो धर्मांधतेत अडकला. लहानपणापासूनच त्याला सुरक्षा सेवेत सामील व्हायचं होतं, पण आपल्या वडिलांच्या हट्टापायी त्याने वैद्यकीय शिक्षण घेत पाकिस्तानी सैन्याच्या मेडिकल कॉर्प्समध्ये सामील झाला. तिथूनच त्याचा संपर्क पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि लष्करी अधिकाऱ्यांशी झाला. वैद्यकीय पदवी पाहता त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने नोकरी सोडायला लावून 1998 साली कॅनडाला पाठवण्यात आलं.

दोन मुलांना जन्म दिला अन्…, न्यायालयाचा पोटगी प्रकरणात धनंजय मुंडेंना धक्का

आता तहव्वूर राणा कॅनडात दाखल झाल्यानंतर तिथे त्याने इमग्रेशन सेवा देण्याचा स्वत:चा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायामुळे त्याला कॅनडातलं नागरिकत्वही मिळालं. त्यानंतर राणाने आपल्याला अमेरिकेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला शिकागोला पाठवण्यात आलं. शिकागोत त्याने आपलं ऑफिसही स्थापन केलं. याच ठिकाणी त्याला 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी डेव्हिड हेडली भेटला. हेडली हा अमेरिकन नागरिक आहे. राणा हा डेव्हिड हेडलीचा जवळचा सहकारी होता. 26/11 च्या हल्ल्यासाठी हेडली अनेकदा मुंबईत आला. राणाच्या कंपनीच्या व्यवसायासाठी आलो असल्याची ओळख त्याने दिली.

वृद्धापकाळात ‘या’ योजनेचा आधार, घरही राहील अन् दरमहा पैसेही मिळतील; जाणून घ्या..

26/11 मुंबई हल्ल्यानंतर एका वर्षानंतर FBI ने शिकागो येथून राणा याला अटक केली होती. राणा आणि त्याचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली या दोघांनी मुंबईतली हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी हे हल्ले केल्याचे तपासात समोर आले होते. मुंबई हल्ल्यातील मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सैन्य किताब देण्याची मागणी त्याने पाकिस्तान सरकारकडे केली होती. स्वतःच्या प्रत्यर्पणाविरोधात त्याने अमेरिकेतील जवळपास सर्वच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तिथल्या सर्वोच्च न्यायालयात त्याचे अपिल फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालायं.

खुलताबादचं नामांतर! …तर आम्ही स्वागतच करु; अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

कराचीमधून समुद्रीमार्गे पाकिस्तानातून दहा दहशतवादी मुंबईत दाखल झाले. समुद्र किनाऱ्यावर उतरताच दहशतवादी विविध ठिकाणी पसरले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्समध्ये अजमल कसाब आणि दुसऱ्या एका दहशतवाद्याने अंदाधुंद गोळीबार करीत अनेक नागरिकांना जखमी केलं. त्यानंतर ताज हॉटेल, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. या हल्ल्यामध्ये एकूण 166 निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर शेकडो नागरिक जखमी झाले. दरम्यान, तहव्वूर राणा एक डॉक्टर म्हणून आयुष्य जगला असता तर चांगलं आयुष्य जगला असता मात्र, धर्मांधता आणि कट्टरतेमुळे आता त्याला स्वत:चं संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल यात काही शंका नाही…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube