Mumbai Attack : तहव्वूर राणाच्यावतीनं अॅड. पियूष सचदेव लढणार केस

Mumbai Attack : मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर हुसैन राणा (Mumbai Attack) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआएकडे सोपवणार आहेत. आता तहव्वूर राणाच्यावतीने अॅड. पियुष सचदेव केस लढणार असल्याची माहिती एनआयए वृत्तसंस्थेकडून देण्यात आलीयं.यासंदर्भातील ट्विट एनआयएने केलंय.
Advocate Piyush Sachdeva from Delhi Legal Services to represent 26/11 Mumbai attacks accused Tahawwur Rana. The advocate has arrived at Patiala House Court in Delhi.
— ANI (@ANI) April 10, 2025
आतापर्यंत पाकिस्तानने 26/11 च्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही त्यामुळे चौकशीत राणा धक्कादायक खुलासे करू शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये इतर कोणते दहशतवादी नेटवर्क आहेत, भारतात इतर कुठे हल्ले करण्याच्या योजना आखल्या जात होत्या? याबाबत देखील त्याच्याकडून माहिती मिळण्याची शक्यता आहे. एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशीष बत्रा आणि डीआयजी जया रॉय तहव्वुर राणाची चौकशी करणार आहे.
वाल्मिक कराडाचा निर्दोष असल्याचा अर्ज, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सविस्तर
केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी रात्री उशिरा एक राजपत्र अधिसूचना जारी केली. यामध्ये म्हटलंय की, सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने खटल्याची सुनावणी करण्यासाठी नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलीय. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. सरकारने यासाठी अधिसूचना जारी केली आहे.
सावधान! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांतील 96 जिल्ह्यांत येणार उष्णतेच्या लाटा; हवामानाचा विभागाचा इशारा
नरेंद्र मान हे एक प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी यापूर्वी सीबीआयसाठी विशेष सरकारी वकील म्हणून अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळली आहेत. यामध्ये 2018 मध्ये झालेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) पेपर लीक प्रकरणाचाही समावेश आहे. अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलेले नरेंद्र मान यांना आता सरकारने तहव्वुर राणा प्रकरणाची जबाबदारीही दिली आहे.