दोन मुलांना जन्म दिला अन्…, न्यायालयाचा पोटगी प्रकरणात धनंजय मुंडेंना धक्का

दोन मुलांना जन्म दिला अन्…, न्यायालयाचा पोटगी प्रकरणात धनंजय मुंडेंना धक्का

Dhananjay Munde – Karuna Sharma Case : राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. करुणा मुंडे प्रकरणात पुन्हा एकदा न्यायालयाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. करुणा मुंडे (Karuna Munde) यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला चार आठवड्यांची स्थगिती देण्यात यावी अशी याचिका धनंजय मुंडे यांनी माझगाव कोर्टात दाखल केली होती मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

त्यांनी 2 मुलांना जन्म दिला आहे. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण माझगांव सत्र न्यायालयाने दिले आहे. काही दिवसांपुर्वी वांद्रे कोर्टाने करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले होते मात्र या आदेशाला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी धनंजय मुंडे यांनी याचिका दाखल केली होती तसेच करुणा शर्मा यांच्याशी लग्न केला नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी या याचिकेत केला होता मात्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांचा दावा फेटाळून लावत करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहे.

दोघांनी 2 मुलांना जन्म दिला आहे. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा झटका बसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे न्यायालयाने धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळवण्यास पात्र ठरतात असं देखील म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करणार, CM फडणवीसांनी दिले आश्वासन 

एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्य असून करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी असं देखील न्यायालयाने म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube