धनंजय मुंडेंना मोठा धक्का! करूणा शर्मांना 2 लाखांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम

Family court’s decision to pay Karuna Sharma 2 lakh as alimony by Dhananjay Munde : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना करूणा शर्मांना पोटगी देण्याच्या प्रकरणात न्यालायाने मोठा दणका दिला आहे. तसेच करूणा शर्मांच्या बाजूने निकाल देत न्यायालयाने त्यांना 2 लाखांची पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून लावली आहे.
नेमकं काय झालं?
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करत पोटगीची मागणी केली होती. न्यायालयाने हे मान्य करत त्यांना पोटगीचा निर्णय दिला होता. मात्र या विरोधात मुंडे पुन्हा न्यायालयात गेले होते की रक्कम कमी असावी मात्र युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
हॉस्पिटलची बिलं अन् 60 रूपयांची गोळी 6 हजारांना; मंगेशकर रुग्णालय प्रकरणी सुरेश धस संतापले
त्यामुळे वांद्रे कोर्टाचा पोटगीबाबतचा निर्णय माझगाव कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. यामध्ये मृत्यूपत्र आणि स्वीकृती पत्र हे या निर्णयामध्ये महत्वाचे ठरल्याचे देखील सांगितले जात आहेत. विशेष म्हणजे, या निकालाद्वारे करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचेही कोर्टाने मान्य केले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाचा माज सरकार उतरवणार का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना पोटगी म्हणून दरमहा दोन लाख रूपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र, माझ्यासोबत मुलंदेखील असल्याने मी दरमहा 15 लाख रूपये देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने 2 लाख रुपये प्रतिमहा पोटगी देण्याचे आदेश दिले होते, दरमहा 15 लाख पोटगी मिळावी. अशी मागणी केली होती. तर मुंडे यांनी 2 लाखांपेक्षा कमी असावी अशी मागणी केली होती. मात्र ती फेटाळून लावण्यात आली आहे.