मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड ताब्यात, आज भारतात आणणार; दिल्ली अन् मुंबईत कोठड्या तयार

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड ताब्यात, आज भारतात आणणार; दिल्ली अन् मुंबईत कोठड्या तयार

Tahawwur Rana Updates : मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज दुपारपर्यंत भारतात आणण्यात येणार आहे. बुधवारीच राणाला घेऊन एक विमान अमेरिकेतून रवाना झाले. आता हे विमान दिल्लीत उतरणार आहे. यामुळे विमानतळावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. SWAT कमांडोंची एक टीम विमानतळावर दाखल झाली आहे. दरम्यान, तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पनासाठी भारत सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांना यश मिळाले आहे. भारत सरकारच्या कूटनितीचा हा मोठा विजय मानला जात आहे.

NIA करणार अटक

भारतात आणल्यानंतर सर्वात आधी एनआए तहव्वूर राणाला अटक करणार आहे. यानंतर त्याला एनआयएच्या मुख्यालयात आणले जाईल. येथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. या प्रक्रिया झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिल्ली विमानतळावर येताच त्याला एनआयएच्या मुख्यालयात आणले जाईल. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेलचे SWAT कमांडो त्याला घेऊन जातील.

26/11 : कॅनडाचा तहव्वूर राणा मुंबईसाठी कसा बनला ‘डॉक्टर डेथ’ वाचा Inside Story

खरंतर तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. 2008 मध्ये मु्ंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाच मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला झाला त्यावेळी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. तरीदेखील केंद्रातील तेव्हाच्या काँग्रेस सरकारने यावर पाकिस्तानला कोणतेच प्रत्युत्तर दिले नव्हते.

मुंबई हल्ल्यातील आणखी एक प्रमुख आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीचा तहव्वूर राणा निकटवर्तीय आहे. 29 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांच्या एका टोळीने मुंबईतील रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्सवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा अमेरिकी नागरिकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला होता. दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी हा हल्ला घडवून आणला होता. याच प्रकरणी नोव्हेंबर 2012 मध्ये पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली होती घोषणा

तहव्वूर राणाला ताब्यात घेण्यासाठी भारत सरकार अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. राणा याचे संबंध लश्कर ए तैयबा आणि डेव्हिड हेडलीशीही आहेत. राणाने अमेरिकी कायद्यांचा उपयोग केला. परंतु, यात त्याला यश मिळालं नाही. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की आमच्या प्रशासनाने जगातील सर्वात वाईट व्यक्ती तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्यास मंजुरी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube