तहव्वुर राणा प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, कोण आहेत नरेंद्र मान?

तहव्वुर राणा प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, कोण आहेत नरेंद्र मान?

Narendra Mann Special Public Prosecutor In Tahawwur Rana Case : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला (Tahawwur Rana Case) स्पेशल विमानाने भारतात आणलं. दुसरीकडे केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी रात्री उशिरा एक राजपत्र अधिसूचना जारी केली. यामध्ये म्हटलंय की, सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने खटल्याची सुनावणी करण्यासाठी नरेंद्र मान यांची (Narendra Mann) विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलीय. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. सरकारने यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

नरेंद्र मान कोण आहेत?

नरेंद्र मान हे एक प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी यापूर्वी सीबीआयसाठी विशेष सरकारी वकील म्हणून अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळली (26 11 Attack) आहेत. यामध्ये 2018 मध्ये झालेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) पेपर लीक प्रकरणाचाही समावेश (Tahawwur Rana Case) आहे. अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलेले नरेंद्र मान यांना आता सरकारने तहव्वुर राणा प्रकरणाची जबाबदारीही दिली आहे.

औरंगजेबपेक्षा क्रुर मुंडे अन् गॅंगला धडा शिकवणार, हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; करूणा शर्मां आक्रमक

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की, राष्ट्रीय तपास संस्था कायदा, 2008 (2008 चा 34) च्या कलम 15 च्या उप-कलम (1) आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 (बीएनएसएस) च्या कलम 18 च्या उप-कलम (8) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, केंद्र सरकार, याद्वारे, एनआयए प्रकरण आरसी-04/2009/एनआयए/डीएलआय आणि इतर संबंधित बाबींच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरिंदर मान यांची नियुक्ती करत आहे. ही नियुक्ती अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून प्रभावी मानली जाईल आणि तीन वर्षांसाठी किंवा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत लागू राहील.

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी राणाला एका विशेष विमानाने भारतात घेऊन आले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी राणासाठी कडक व्यवस्था केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात येईल. तो सुरुवातीला एनआयएच्या कोठडीत असेल, जिथे कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या जातील. त्याच्याविरुद्ध दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी सुरू होऊ शकते.

Santosh Deshmukh : मारहाणीचा ‘तो’ व्हिडिओ न्यायालयात सादर; सुनावणीत नेमकं काय घडलं?

आज महावीर जयंतीची सुट्टी असल्याने, राणा एनआयए न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानी विशेष व्यवस्थेअंतर्गत ऑनलाइन हजर राहू शकतो. न्यायालयीन खटला मुंबईहून दिल्लीला हलवण्यात आल्यामुळे सुनावणी दिल्लीत होईल. राणाला अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयए पुराव्यांच्या आधारे राणाला अटक करेल. तिहार तुरुंगात त्याला ठेवण्यासाठी एक सेलही तयार करण्यात आलाय. तिहारमधील सीसीटीव्हीने सुसज्ज कक्षात त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवले जाईल. तहव्वूर राणा याची चौकशी करण्यासाठी तपास संस्थांच्या अनेक पथके तयार करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं. एजन्सी त्याच्या जबाबांची तुलना हल्ल्याबाबत आधीच उपलब्ध असलेल्या पुराव्यांशी करतील. याशिवाय हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे फोटो दाखवून पाकिस्तानविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube