साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरातांचे साटंलोटं, निवडणूक बिनविरोध…केवळ घोषणा बाकी

Radhakrishna Vikhe and Balasaheb Thorat On Sugar Factory Elections : अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन पारंपरिक राजकीय शत्रू म्हणजे राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) अन् बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे होय. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र दिसून आला. आता त्यांनतर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दोंघांमध्ये चांगलाच सामना होणार, अशी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळणार, असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. प्रवरा आणि थोरात कारखान्याच्या निवडणुका (Sugar Factory Elections) एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतल्यांचं समजते आहे. सहकारात अलिखित करार असल्याचे सांगत, मंत्री विखे पाटलांनी निवडणुका बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
विखे कारखान्याची निवडणूक बिनविरोध
राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाखालील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी विखे गटाकडून 21 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात (Ahilyanagar Politics) आले. विरोधी शेतकरी मंडळाकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे. असे असले तरी 15 ते 29 एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. त्यानंतरच निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा होईल.
धक्कादायक! साधं पाणी पिलं अन् 118 कर्मचारी थेट दवाखान्यात; कारण ऐकून पोलिसही चक्रावले
थोरात कारखान्याची निवडणूक बिनविरोध
एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष साखर कारखाना निवडणुकीत पुन्हा बघायला मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, भाऊसाहेब थोरात यांच्या सहकारी कारखाना निवडणूक देखील बिनविरोध होणार, असे स्पष्ट झाले आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी 133 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, हे सर्व अर्ज थोरात समर्थकांचे असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे विरोधकांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असेच म्हणता येईल.
मोठी बातमी! एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती
विखे-थोरातांनी पाळला सहकाराचा नियम
मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे राजकीय शत्रू काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकाराचा नियम पाळत एकमेकांच्या कारखाना निवडणुकीत हस्तक्षेप केला नाही. दरम्यान यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्येही विखे कारखाना व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. हीच परंपरा दोन्ही नेत्यांनी यंदाही पाळल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान बुधवारी उमेदवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. 15 ते 29 एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच बिनविरोध निवडणुकीची अधिकृत घोषणा होईल.