Balasaheb Thorat : ‘दहशतीसाठी येता, खोट्या केसेस टाकता पण, आम्ही’.. थोरातांनी विखेंना ललकारलं

Balasaheb Thorat : ‘दहशतीसाठी येता, खोट्या केसेस टाकता पण, आम्ही’.. थोरातांनी विखेंना ललकारलं

Balasaheb Thorat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पुन्हा एकदा कट्टर राजकीय विरोधक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर घणाघाती टीका केली. थोरात यांचा कृतज्ञता सोहळा संगमनेर येथे आयोजित करण्यात आला होता. वडगावपान येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी थोरात यांनी विखेंवर सडकून टीका केली. आम्ही काँग्रेसशी प्रामाणिक राहिलो. तुम्ही संधीसाधू, इकडे तिकडे उड्या मारून मंत्रिपदं घेता. मात्र जनतेला हे मान्य नाही. खोट्या केसेस टाकून संगमनेरच्या लोकांना त्रास देण्याचे उद्योग सुरू आहेत. पण आम्ही पुरून उरू, अशा शब्दांत थोरात यांनी विखेंवर टीका करत त्यांना आव्हान दिलं.

‘मतदान दक्षिणेतून अन् साखर उत्तरेत..; विखेंच्या साखरेला ठाकरे गटाचा कडवा डोस

यानंतर थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फैलावर घेतले. संगमनेर तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला आम्ही पुरून उरू. सरकार म्हणून प्रशासनावर तुमची पकड आहे की नाही, असा सवाल त्यांनी नामोल्लेख टाळत फडणवीस यांना केला. चांगली कामं करण्यासाठी आम्ही राहत्यात जातो. तुम्ही मात्र संगमनेर तालुक्यात दहशत माजवण्यासाठी आणि विकास मोडण्यासाठी येता. खोट्या केसेस टाकून संगमनेरच्या लोकांना त्रास देण्याचे उद्योग सुरू आहेत. पण आम्ही पुरून उरू, असा दम थोरात यांनी मंत्री विखे यांना दिला.

तुमच्याकडून अजूनही मनमाड रस्ता होईना 

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेवरही भाष्य करत थोरात यांनी विखेंवर निशाणा साधला. आपला विकास थांबणाऱ्यांना घेऊन नाचू नका. मी दहा वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्ग केला. तुमच्याकडून मात्र अजूनही नगर-मनमाड महामार्ग होत नाही. कोल्हापूर येथील पूलही त्याच अवस्थेत आहे. तुम्ही विकासाच्या गप्पा मारता आणि आम्हाला शिकवता, असा सवाल थोरात यांनी केला.

Ahmednagar Politics : विखेंचं ‘पॉवर’ पॉलिटिक्स! थोरातांचा ‘तो’ निर्णय झटक्यात फिरवला

समन्यायी पाणीवाटप कायद्याचा फेरविचार व्हावा 

काही दिवसांपूर्वी समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांत जोरराद शाब्दिक युद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी थोरात यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्याविरोधात आपणच संघर्ष केला होता, हा संघर्ष सुरू असतांना अनेक नेते गप्प बसून होते, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर केली होती. त्यावर विखेंनी जोरदार पलटवार करत समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी टाळता येणार नाही, असे थोरातांना सुनावले होते.

ज्यांनी एकेकाळी समन्यायी पाणी वाटप कायदा विधेयकाला सभागृहात पाठिंबा दिला आणि नगर जिल्ह्यातील हक्काचे पाणी सोडण्यास हातभार लावला, तेच आज पाणी सोडण्याच्या विरोधात बोलू लागले आहेत. या कायद्याच्या पापाची जबाबदारी जिल्ह्याच्या मानगुटीवर टाकून तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही, असे विखे म्हणाले होते. त्यानंतर थोरात यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर भाष्य केले. 2005 च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचा विचार करून नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याचा कायदा संमत झाला होता. या कायद्याचा फेरविचार व्हावा, अशी भूमिका थोरातांनी यावेळी स्पष्ट केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube