बायको नांदेना…कंटाळलेल्या जावयाने केला सासऱ्याचा खून…पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य
Ahilyanagar Crime : पारनेर तालुक्यात 22 फेब्रुवारी रोजी 55 वर्षीय रामदास निवृत्ती सोनवणे (रा. निमगाव सावा, ता.जुन्नर जि.पुणे) यांची हत्या
Ahilyanagar Crime : पारनेर तालुक्यात 22 फेब्रुवारी रोजी 55 वर्षीय रामदास निवृत्ती सोनवणे (रा. निमगाव सावा, ता.जुन्नर जि.पुणे) यांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावे असे आदेश सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. तर आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोनि किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोउपनि/संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, दिपक घाटकर, रिचर्ड गायकवाड, अमृत आढाव, रमिझराजा आत्तार, आकाश काळे, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणुन आरोपी ताब्यात घेण्याची कारवाई करण्यासाठी सुचना व मार्गदर्शन केले.
या आदेशानंतर पथकातील पोलीसांनी घटना ठिकाणी भेट देवुन घटनास्थळाची पाहणी करत असताना रामदास सोनवणे यांची हत्या त्यांचे जावई अमित नारायण डुकरे व त्याचे मित्र अमोल उत्तम डुकरे यांनी मिळुन केली असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोघांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
रामदास सोनवणे सासरे असून माझी पत्नी ही सुमारे एक वर्षापासुन नांदत नसुन मला एक सव्वा वर्षाची मुलगी आहे. रामदास सोनवणे वारंवार वाद घालुन माझी मुलगी हिस मारुन टाकण्याची धमकी देत होता. त्याचा राग आल्याने कारमध्ये घेवुन जावुन त्यांचे गळा आवळुन हत्या केली असल्याची कबुली आरोपी अमित नारायण याने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मी बदनामी होऊ देणार नाही…, न्यायालयातील भ्रष्टाचाराचा पाठ्यपुस्तकात समावेश अन् सरन्यायाधीश भडकले
ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन हे करीत आहे.
