गुंड अण्णा लष्करेच्या मुसक्या आवळणारे सोमनाथ घार्गे नगरचे SP; जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान

गुंड अण्णा लष्करेच्या मुसक्या आवळणारे सोमनाथ घार्गे नगरचे SP; जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान

Ahilyanagar News : गृह विभागाकडून नुकतेच राज्यातील २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान घार्गे हे यापूर्वीही नगर जिल्ह्यात कार्यरत होते विशेष म्हणजे आपल्या कार्यकाळात त्यांनी नेवाशातील अण्णा लष्करे या कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याविषयी जाणून घेऊ या…

लष्करेच्या पायावर गोळी झाडून पकडलं

जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले सोमनाथ घार्गे यांनी यापूर्वीही जिल्ह्यात काम केलेले आहे. जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2006 ते 22 जानेवारी 2009 या कालावधीत श्रीरामपूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम केले होते. या काळात त्यांनी कुख्यात गुंड अण्णा लष्करेच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घातला. विशेष म्हणजे लष्करे याचा वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी थेट गोळीबाराची कारवाई केली होती. घार्गे यांनी लष्करेच्या पायावर गोळी झाडून त्याला जखमी करत त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

याशिवाय, श्रीरामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण केला होता. आपल्या कार्यकाळात श्रीरामपूर येथील बहुचर्चित अरुणा बर्डे हत्याकांड आणि देवळाली प्रवरा येथील बबलू पंडित हत्याकांडाचा यशस्वी तपास त्यांनी केला होता. त्यांच्या कार्यकाळात सोने तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणात 50 तोळे सोने जप्त करून तस्करीच्या रॅकेट त्यांनी उघडकीस आणले होते.

राकेश ओला यांची बदली, सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे एसपी; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी

इराणी टोळीवरही त्यांनी कठोर कारवाई करत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या धाडसी आणि परिणामकारक कारवायांमुळे त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात यशस्वी अधिकारी म्हणून ओळख मिळाली. त्यांचा थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि समाजमन जपण्याचा दृष्टिकोन त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतो. दरम्यान नगर जिल्ह्याचा अभ्यास असलेले घार्गे यांच्यापुढे सध्या जिल्ह्यातील परिस्थिती महत्वाचे आव्हाने देखील असणार आहे.

एसपी घार्गेंसमोर ‘ही’ आहेत आव्हाने

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळापासून अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून तसेच स्थानिक पोलीस स्टेशनकडून अनेकदा याविरोधात पाऊले उचलली जातात मात्र यावर प्रतिबंध घालण्यात अद्याप पोलिसांना अपेक्षित असे यश आले नाही. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, चोरी, खून यामध्ये गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून आलं आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या अमली पदार्थांसह नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची वाहतूक आणि विक्री मोठ्या प्रमाणावर झाल्याचं गुन्हे उघडकीस आले आहेत. अवैध व्यवसाय, सराईत गुन्हेगारांवर आळा घालण्याचं नवनियुक्त पोलीस अधीक्षकांसमोर आव्हान आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत असलेल्या जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

“आम्ही नातं जोडायला सकारात्मक, उद्धव ठाकरेंची..”, शिवसेना-मनसे युतीसाठी संजय राऊतांचे संकेत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube