75 व्या वर्षी रिटायरमेंट नाही! मोहन भागवत यांचे मोठे विधान, ‘स्वयंसेवक आयुष्यभर कार्यरत…’

75 व्या वर्षी रिटायरमेंट नाही! मोहन भागवत यांचे मोठे विधान, ‘स्वयंसेवक आयुष्यभर कार्यरत…’

Mohan Bhagwat Statement On Retirement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शंभर वर्षांच्या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात 75 वर्षांनंतर निवृत्तीची चर्चा आणि त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. मोहन भागवत म्हणाले, मी कधीही असं म्हटलं नाही की, मी 75 वर्षांनंतर निवृत्त होईन किंवा कोणाला निवृत्त होण्यासाठी (Mohan Bhagwat Statement On Retirement) सांगेल. त्यांनी स्पष्ट केलं की, याआधी केलेल्या विधानात त्यांनी माजी सरकार्यवाह मोरोपंत पिंगळे यांचा उल्लेख केला होता.

त्यांचा हेतू निवृत्तीचा… 

भागवत यांनी आठवण करून दिली की, मोरोपंत पिंगळे अत्यंत विनोदी स्वभावाचे (Maharashtra Politics) होते. वयाच्या सत्तराव्या वर्षी एका सर्वभारतीय कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना शाल देऊन बोलण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मिश्किलपणे म्हटलं, आता शाल मिळाली म्हणजे तुमचं वय झालं. एका खुर्चीवर बसा आणि पाहा, काय चाललं आहे. पण त्यांचा हेतू निवृत्तीचा नव्हता.

उद्धव ठाकरे, शरद अन् अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा; वाचा, कोणत्या नेत्याने दिली साथ..

रिटायरमेंट बेनिफिट

भागवत पुढे म्हणाले, संघात आपण सर्वजण स्वयंसेवक आहोत. माझं वय 80 वर्षं झालं, संघाने मला सांगितलं की ‘जा, शाखा चालवा’, तर मी नक्कीच जाईन. इथे कुणालाही असं म्हणण्याचा अधिकार नाही की, माझं वय झालं, म्हणून मी निवृत्ती घेऊन आराम करणार. कारण संघात कुठलीही ‘रिटायरमेंट बेनिफिट’ नाही.

PHOTO : आझाद मैदानावर तुफान गर्दी, लाखो मराठी आंदोलकांची उपस्थिती

वयाच्या आधारावर निवृत्तीची बंधने

भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संघाच्या भूमिकेवर विचारले असता भागवत म्हणाले, आम्ही तेच करतो जे संघ आम्हाला सांगतो. मी एकटाच सरसंघचालक होऊ शकतो असं मुळीच नाही. कोणत्याही वयात स्वयंसेवक काम करू शकतो किंवा बाजूला होऊ शकतो. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वयाच्या आधारावर निवृत्तीची बंधने नाहीत. स्वयंसेवक आयुष्यभर सक्रिय राहू शकतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube