सणासुदीच्या काळात हृदयाकडे दुर्लक्ष नकाे! हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी काय कराल, डॉक्टर सांगतात…

Don’t neglect heart health during the festive season tips for healthy heart by Doctors : सणासुदीच्या काळात आरोग्याच्या जवळजवळ सर्वच गोष्टींकडं थोडं दुर्लक्ष होतं. सणांच्या काळात घरातील कामे वाढलेली असतात, व्यायामाकडे मग आपसुकच दुर्लक्ष केलं जातं. खाण्या-पिण्याच्या पथ्यांचे नियम तर स्थगितच होतात. गोडधोडाच्या पदार्थांचे त्यामुळे कितीही टाळले तरी खाणे होतेच. परंतु तुम्हाला माहितीये का, या सर्व गोष्टींची किंमत तुमच्याच शरीराला चुकवायला लागते?
>“जाहीर दिलगिरी” पण मूळ खलनायकाचे अखेर रंगमंचावर प्रगटीकरण! ‘त्या’ वक्तव्यावर विश्वास पाटलांची माफी
सणासुदीच्या काळात (Festive Season) खाल्या जाणाऱ्या पदार्थांवर नियंत्रण न ठेवल्याने तुमच्या हृदयावर (Heart Health) ताण येऊ शकतो. न्यूईरा हॉस्पिटल, नवी मुंबई येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. गौरव सुराणा यांनी हृदयाची (Heart Health) काळजी घेण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सणांच्या दरम्यान आवर्जून काय खावे आणि आहारातून काय वगळावे याची चर्चा आपण या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.
लालबाग राजाच्या विसर्जनानंतर कोणी पाठवलं CMला पत्र?, मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार?
खाण्या-पिण्याची पथ्ये आवश्यकच
सण साजरा करण्यासाठी (Festive Season) आपले प्रियजण, कुटुंबीय आणि मित्र परिवार एकत्र येतात. या दरम्यान पारंपारिक पदार्थ, मिठाई, तळलेले पदार्थ, पचनास जड पदार्थ आणि अगदी मद्यपानाचाही आनंद घेतला जातो. जरी हे पदार्थ आकर्षक आणि स्वादिष्ट असले, तरी ते आपल्या हृदयावर परिणाम करू शकतात. विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह (Diabetes) किंवा हृदयरोग (Heart Health) यांसारखे आजार आहेत त्यांच्यासाठी हे पदार्थ घातक ठरु शकतात. अति खाणे, चुकीच्या पदार्थांची आहारात निवड करणे, ताणतणाव आणि अनियमित दिनचर्या यांमुळे अनेकांना उच्च रक्तदाब (Blood Pressure), मधुमेह (Diabetes), हृदयरोग यांसारखे आजार होऊ सणांच्या दिवसांतच (Festive Season) होऊ शकतात.
“लक्ष्मण हाकेंचे ते संस्कारच… तर रोहित पवारांना पोटदुखी झालीये…”, परांजपेंनी घेतलं फैलावर
हृदयावर कसा परिणाम होतो?
सणावाराच्या (Festive Season) दिवसांमध्ये कॅलरीजयुक्त पदार्थ, गोड, तळलेल्या आणि खारट पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थ कोलेस्ट्रॅालची पातळी, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी (Diabetes) वाढवू शकतात. सणासुदीच्या काळात (Festive Season) होणाऱ्या पार्टीजमुळे मद्यपान आणि रात्री उशिरापर्यंतचे जागरण हृदयावर (Heart Health) अधिक दाब निर्माण करतात. हृदयरोगींच्या आहारात आणि जीवनशैलीत अचानक बदल झाल्यास छातीत दुखणे, धडधडणे, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका (Heart Health) अशा समस्या उद्भवू शकतात. शिवाय अपुरी झोप, कार्यक्रमांचे नियोजन किंवा तयारीचा मानसिक ताण आणि सुट्टीच्या काळात वेळेवर औषधं न घेणे किंवा वगळणे हे देखील यास कारणीभूत ठरतात आणि हृदयाच्या समस्या निर्माण करतात.
26 अॅप्सवर बंदी अन् नेपाळमध्ये ‘सोशल’ राडा, आंदोलनाने घेतला 14 जणांचा जीव नेमकं प्रकरण काय?
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
गोड, तळलेले, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन (Festive Season) टाळा. एकाच वेळी भरपेट न खाता थोड्या थोड्या अंतराने हलका आहार घ्या. पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा. आहारात ताजी फळे, भाज्या आणि सॅलड यांचा समावेश करा. दररोज किमान 45 मिनिटे न चुकता व्यायाम करा. हलका व्यायाम, मॉर्निंग वॉक किंवा साधे स्ट्रेचिंग केल्याने वजन नियंत्रणात राखण्यास मदत होऊ शकते. मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाब (Blood Pressure) असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घ्या. छातीत दुखणे (Heart Health) , अस्वस्थ वाटणे किंवा चक्कर येणे यासारखी लक्षणं आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या.