“लक्ष्मण हाकेंचे ते संस्कारच… तर रोहित पवारांना पोटदुखी झालीये…”, परांजपेंनी घेतलं फैलावर

Aanand Paranjape on Hake

Aanand Paranjape on Laxman Hake regarding IPS Anjana Krishna Rohit Pawar : अजित पवारांनी आयपीएस अंजना यांना फोनवरुन दम दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या प्रकरणावरुन अजित पवारांवर प्रचंड टीका झाली. या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही अजित पवारांवर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. लक्ष्मण हाके म्हणाले, “अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये. त्यांनी शरद पवार यांचा वारसा सांगू नये. अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणे त्यांना शोभत नाही”, असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

आमदार रोहित पवारांनी मंत्री बावनकुळेंची केली कोंडी, ‘ते’ आव्हान स्वीकारत दिलं प्रतिआव्हान

आता लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उत्तर दिले आहे. “लक्ष्मण हाके हे आधी पासून सातत्याने आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याविरूद्ध अशोभनीय, खालच्या पातळीची भाषा, अयोग्य शब्द वापरत असतात पण त्यातून त्यांचे संस्कार दिसून येतात”, अशा शब्दांत त्यांनी (Laxman Hake) हाकेंना फैलावर घेतले आहे.

“नागपुरात महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढाई लढणार…”, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक

लक्ष्मण हाके चपटीचे ब्रॅंड ॲंबेसेडर

लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यावर जोरदार टीका करताना आनंद परांजपे (Aanand Paranjape) म्हणाले की “अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरूद्ध अशोभनीय, खालच्या पातळीची भाषा, अयोग्य शब्द वापरत ते वापरत असतात पण त्यातून त्यांचे संस्कार दिसून येतात. त्यांनी अजित पवार यांच्याबाबत अयोग्य शब्द वापरले, मग आम्ही त्यांना म्हणायचे का, की ते चपटीचे ब्रॅंड ॲंबेसेडर आहेत?. महाराष्ट्रात मराठा विरूद्ध ओबीसी वातावरण खराब करण्याचं काम लक्ष्मण हाके (Laxman Hake) करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यानी कालच स्पष्ट केलं की, कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचं अहित होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचं सरकार घेणार नाही. या महाराष्ट्रात मराठा विरूद्ध ओबीसी वाद कसा होईल एवढाच प्रयत्न लक्ष्मण हाके (Laxman Hake) करत असतात. माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी” असेही आनंद परांजपे (Aanand Paranjape) यावेळी म्हणाले.

Navya Nair : सावधान! केसांत गजरा माळताय? लाखोंचा फटका बसू शकतो…

म्हणून रोहित पवारांना पोटशूळ

पुढे रोहित पवारांनाही (Rohit Pawar) आनंद परांजपे यांनी निशाणा बनवले आहे. ‘देवाभाऊ’ जाहिरांतीवरून रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना परांजपे म्हणाले की, “काहीतरी खमंग आरोप करणं हा रोहीत पवार यांचा स्थायीभाव आहे. त्यांना (Rohit Pawar) नेते व्हायची खूप घाई झाली आहे. त्यामुळे ते असे आरोप करत असतात. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी त्यांना आव्हान दिले आहेत की, आरोप सिद्ध करा नाही तर राजकीय संन्यास (Rohit Pawar) घ्या. महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण दिलं. रोहित पवारांना (Rohit Pawar) याचं कुठेतरी पोटशूळ आहे. म्हणूनच ते असे बेछूट आरोप ते करत आहे”, असंही परांजपे (Aanand Paranjape) यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube