“नागपुरात महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढाई लढणार…”, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक

Vijay Vaddetiwar OBC Reservation

Congress leader Vijay Wadettiwar on CM Fadnavis on OBC Reservation : आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा शासन निर्णय जारी केला. मात्र या शासन निर्णयानंतर ओबीसी समाज आता आक्रमक होताना दिसतो आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावरून मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून मात्र दोन्ही समाजाला खुश ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Navya Nair : सावधान! केसांत गजरा माळताय? लाखोंचा फटका बसू शकतो…

दरम्यान, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (OBC Reservation) वाचवण्यासाठी काँग्रेस आता थेट रस्त्यावर उतरणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं आहे. नागपुरात शनिवारी विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यातील ओबीसी संघटनांची बैठक पार पडली. “राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे मूळ ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढणार”, असे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं आहे.

रोहित पवार जी, …अन्यथा राजकीय संन्यास घ्या ; बावनकुळे रोहित पवारांना असं का म्हणाले?

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यानंतर म्हणाले की, “मुख्यमंत्री (CM Fadnavis) काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे (OBC Reservation) नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या जीआरमध्ये पात्र असा शब्द वापरला होता. मात्र, दुसऱ्या जीआरमधून तो शब्द काढून टाकला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून (OBC Reservation) सरसकट आरक्षण देणार असा होतो. त्यामुळे हा मूळ ओबीसींवर अन्याय असून याविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार”, असे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

तसंच “ओबीसींसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते. पण, नेत्यांना ओबीसींची भीती वाटू लागताच ही अडचण आपोआप दूर होईल”, असंही वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यावेळी म्हणाले.

नगर-मनमाड रस्त्यावरून तनपुरे आक्रमक! अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, ठेकेदारांवर कारवाईची मागणी

आर्थिक अडचण येऊ देणार नाही

पुढे बोलताना कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, “ओबीसींच्या लढ्यासाठी (OBC Reservation) प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही. छगन भुजबळ यांच्या मताशी भूमिकेशी आम्ही सहमत आहे. मराठा आरक्षणासाठी शासनाने काढलेल्या जीआरमुळे ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे. 27 टक्के आरक्षणातून 13 टक्के आधीच वजा होते. उरलेल्या 19 टक्क्यांतही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना (OBC Reservation) किती उरणार”? असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला.त्यानंतर “कुणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या”, असं आवाहनही त्यांनी (Vijay Wadettiwar) यावेळी केलं.

ऐश्वर्य ठाकरेचा डबल डेब्यू; ‘पिजन कबूतर’ गाण्याने इनिंगला धमाकेदार सुरुवात

दोन पातळ्यांवर लढाई लढणार

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, “दरम्यान, नागपुरात येत्या 12 सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची (OBC Reservation) बैठक होणार आहे. त्यानंतर पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाईल. विदर्भातून वकील संघटना पूर्ण ताकदीने न्यायालयात ओबीसींची बाजू मांडणार आहे. तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल, कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका असली तरी ओबीसींच्या आरक्षणाला देखील धक्का लागू नये ही पण आमची भूमिका आहे”. असं वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube