रोहित पवार जी, …अन्यथा राजकीय संन्यास घ्या ; बावनकुळे रोहित पवारांना असं का म्हणाले?

Chandrashekhar Bawankule on Rohit Pawar

Chandrashekhar Bawankule on Rohit Pawar : भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आव्हान दिलं आहे. रोहित पवार जी, अन्यथा, राजकीय संन्यास घ्या. असं आव्हान बावनकुळेंनी दिलं आहे. बावनकुळे रोहित पवारांना असं का म्हणाले? हे प्रकरणं नेमकं काय? जाणून घेऊ…

नेमकं प्रकरणं काय?

नुकतच राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आलं आहे. कारण जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाची दखल घेत राज्यातील फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला आहे. त्यानंतर भाजप आणि सरकारकडून या यशाचं श्रेय फडणवीसांना दिलं जात आहे. त्यासाठी राज्यभर जाहिराती दिल्या जात आहेत. त्यातच एक निनावी लावलेली जाहिरात चर्चेंचा विषय ठरला आहे.

ऐश्वर्य ठाकरेचा डबल डेब्यू; ‘पिजन कबूतर’ गाण्याने इनिंगला धमाकेदार सुरुवात

ही जाहिरात निनावी का लावली गेली? या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? असा सवाल विरोधक आणि रोहित पवारांनी केला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, रोहित पवार जी, फारच मोठ्ठा शोध लावला तुम्ही! महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला, हा आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजकीय संन्यास घ्या. करा सिद्ध!

काय म्हणाले होते रोहित पवार?

बावनकुळे साहेब, तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?

आनंदाची बातमी! टॅरिफचे नुकसान भारत काढणार भरून; 135 अब्ज डॉलरच्या व्यापाराची संधी

या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube