ऐश्वर्य ठाकरेचा डबल डेब्यू; ‘पिजन कबूतर’ गाण्याने इनिंगला धमाकेदार सुरुवात

Aishwary Thackeray debut in Acting and Music by Film Nishanchi : दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी चित्रपट ‘निशानची’ मध्ये ऐश्वर्य ठाकरे प्रमुख भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटातून तो केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर गीतकार आणि संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आहे. ‘पिजन कबूतर’ हे हटके आणि कॅची गाणं नुकतंच झी म्युझिक कंपनीने रिलीज केलं आहे.
मृत्यूशी झुंज ठरली अपयशी; PSI परीक्षेत अव्वल आलेल्या पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी अंत
या गाण्याचे बोल आणि संगीत ऐश्वर्य ठाकरे याने स्वतः लिहिले आणि संगीतबद्ध केले असून, भूपेश सिंग यांनी हे गाणं गायलं आहे. खास हिंग्लिश शैलीतील हे गाणं, त्याच्या मजेशीर लिरिक्स आणि उर्जा भरलेल्या बीट्समुळे लवकरच प्रेक्षकांच्या ओठांवर रुळू लागलं आहे. गाण्याची हुकलाइन – “पिजन कबूतर भइया, उड़न फ्लाई, लुक देखो आसमान इस्काई” – सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.
‘निशानची’मधील डबल रोल आणि हटके साउंडट्रॅक
चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे डबल रोलमध्ये दिसणार आहे आणि त्याचा अभिनय तर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री वेदिका पिंटो प्रमुख भूमिकेत दिसणार असून, मोनिका पनवार, मोहम्मद झिशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. ‘निशानची’ चित्रपटाचे संगीत एल्बम 15 गाण्यांनी सजलेले असून, ते प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये आपले स्थान पटकावू लागले आहे. ‘पिजन कबूतर’ हे गाणं या एल्बममधील एक वेगळं आणि लक्ष वेधणारं गाणं आहे.
ऐश्वर्य ठाकरेचं म्युझिक डेब्यूवर भावनिक वक्तव्य
या गाण्याच्या निर्मितीचा अनुभव शेअर करताना ऐश्वर्य म्हणतो की, “मी जेव्हा अभिनय करायला सुरुवात केली, तेव्हाच ठरवलं होतं की माझ्या पहिल्या चित्रपटात मी स्वतःचं गाणं आणायचं. एक रात्री 3 वाजता मला झोप येईना, मी उठलो, कीबोर्ड आणि गिटार घेतला आणि ‘निशानची’च्या कथेतली धमाल आणि नटखट उर्जा टिपण्यासाठी गाण्याची कल्पना रेकॉर्ड करायला सुरुवात केली. सकाळपर्यंत गाणं तयार झालं. मी अनुराग सरांना पाठवलं आणि त्यांनी पाच हार्ट इमोजीसह उत्तर दिलं – ‘हे माझं आवडतं गाणं आहे. पूर्ण कर आणि पाठव.’”
ब्रेकिंग! छगन भुजबळ कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाच्या नव्या जीआरला आव्हान?
गायक भूपेश सिंग यांचं म्हणणं आहे की, “हे गाणं गाताना मी एकदम खुश होतो. ऐश्वर्यच्या बोलांमध्ये एक वेगळी मजा आहे आणि संगीतही तितकंच धमाल आहे. या गाण्यामुळे मला माझ्या आवाजात वेगळं काही करून पाहण्याची संधी मिळाली. अनुरागसोबत काम करणं नेहमीच खास असतं आणि हे गाणं निशानचीच्या जगात अगदी मस्त बसतंय.”
‘निशानची’ – एका गुंतागुंतीच्या बंधुत्वाची कथा
‘निशानची’ ही कथा दोन भावांभोवती फिरते, जे एकमेकांपासून खूप वेगळे असून त्यांचे निर्णय त्यांच्या आयुष्याला कशी दिशा देतात हे दाखवलं आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ही फिल्म रॉ, उर्जासंपन्न आणि देसी फ्लेवरने भरलेली आहे. ही फिल्म अमेज़न MGM स्टुडिओज इंडिया सादर करत आहे आणि जार पिक्चर्स व फ्लिप फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झाली आहे. चित्रपटाची कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी लिहिली आहे. निशानची’ हा अॅक्शन, ह्युमर आणि ड्रामाने भरलेला फुल मसाला एंटरटेनर चित्रपट येत्या 19 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.