मृत्यूशी झुंज ठरली अपयशी; PSI परीक्षेत अव्वल आलेल्या पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी अंत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मागील अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. मात्र हा लढा अपयशी ठरला आहे.

Ashwini Kedari

Ashwini Kedari Passes away : पुण्यातून अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. 2023 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत अश्विनी महिला प्रवर्गात राज्यात पहिली आली होती. मागील अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. मात्र अश्विनीचा हा लढा आता अपयशी ठरला आहे. या धक्कादायक घटनेने पुण्याच्या संपूर्ण खेड तालुक्यात आता शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग! छगन भुजबळ कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाच्या नव्या जीआरला आव्हान?

अश्विनीचा भीषण अपघात

28 ऑगस्ट रोजी अश्विनी केदारीसोबत (Ashwini Kedari) एक दु:खद प्रसंग घडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अभ्यास करत असताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. त्यानुसार पाणी किती गरम झाले आहे, हे पाहण्यासाठी जेव्हा ती बाथरूममध्ये गेली त्याच वेळी तिला हीटरचा मोठा झटका लागला. या शॉकमुळे उकळते पाणी तिच्या अंगावर पडले आणि या भीषण अपघातात ती तब्बल 80 टक्के भाजली. यानंतर कुटुंबीयांनी तिला (Ashwini Kedari) तातडीने पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील (Pune) रुग्णालयात दाखल करत उपचार सुरु केले. गेल्या 11 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान तिचे दुःखद निधन झाले.

या निजामाच्या अवलादींना ओबीसीतून… नवनाथ वाघमारेंनी जरागेंना ललकारलं

महाराष्ट्रात अव्वल

अश्विनी केदारी (Ashwini Kedari) यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वत्र सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या पुण्यातील (Pune) खेड तालुक्यातील पाळू (Pune) येथील शेतकरी कुटुंबातील होत्या. 2023 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून अश्विनी प्रथम आल्या होत्या. बाथरुममध्ये हिटरचा धक्का बसून उकळतं पाणी अंगावर सांडल्यामुळे केदारी जवळपास 80 टक्के भाजल्या होत्या. अकरा दिवस त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. मात्र त्यांचे (Ashwini Kedari) निधन झाले.

Maratha reservation : अन्यथा, …मोठा निर्णय घ्यावा लागेल! मनोज जरांगे पाटलांचा थेट सरकारला अल्टीमेटम

जिल्हाधिकारी व्हायचं होतं, पण…

अश्विनी केदारी (Ashwini Kedari) यांनी 2023 मध्ये पीएसआय परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलं होतं. पण त्यांना जिल्हाधिकारी व्हायचं होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. त्यासाठी अभ्यासही सुरू होता. पण अपघातानंतर त्यांच्या (Ashwini Kedari) अकाली निधनाने त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अश्विनी केदारी यांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर पीएसआय पदाला गवसणी घातली होती. अश्विनी केदारींच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र (Pune) हळहळ व्यक्त केली जात आहे.

follow us