या निजामाच्या अवलादींना ओबीसीतून… नवनाथ वाघमारेंनी जरागेंना ललकारलं

Navnath Waghmare on Manoj Jarange for Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या आदेशामुळे अस्वस्थ असलेल्या ओबीसी नेत्यांकडून सध्या राज्य सरकार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्यामध्ये आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यानंतर आता नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी देखील जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. ते रविवारी 7 सप्टेंबर रोजी झालेल्या भोगलवाडीमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये बोलत होते.
काय म्हणाले नवनाथ वाघमारे?
यावेळी बोलताना वाघमारे (Navnath Waghmare) म्हणाले की, जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता. तसेच जरांगे भुजबळांविरोधात गरळ ओकण्याचं काम करतोय. त्यामुळे सरकारने आणलेला हा जीआरचा निर्णय हाणून पाडला पाहिजे. आता रस्त्यावर लढाई करणे गरजेचे आहे. या निजामाच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध करायला हवा. स्वत: ला फुले, शाहू, आंबेडकरांचा पाईक म्हणणाऱ्या शरद पवार आणि राजेश टोपेंनी हे आंदोलन सुरू केलेले आहे. राज्यात मराठा 15 टक्केही नाहीत. असे घाणेरडे लोक मराठा असू शकत नाहीत.
सोनवणे आणि क्षीरसागरांवर हल्लाबोल
तसेच यावेळी वाघमारे यांनी बीडमधील शरद पवार गटाचे मराठा समाजाचे असलेले खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ओबीसींनी पवारांना घरचा रस्ता दाखवून धडा शिकवला आहे. मात्र पापड्या आमदार आणि चंदनचोरला निवडून देणं ही गेवराईकर आणि ओबीसींची चूक झाली आहे. असं म्हणत वाघमारे यांनी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला.
Maratha reservation : अन्यथा, …मोठा निर्णय घ्यावा लागेल! मनोज जरांगे पाटलांचा थेट सरकारला अल्टीमेटम
तसेच ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये क्षीरसागर यांचे घर पेटवलं तेव्हा त्यांना मुस्लिमांनी मदत केली. मात्र ते जरांगेंना पाठींबा देत आहेत. तसेच नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडेंना भेटले की, टीका केली जाते. मात्र तुमचे महंच जरांगेंना दवाखान्यात जाऊन भेटतात. त्याच काय? असा सावाल देखील यावेळी वाघमारेंनी केला आहे.
भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणारे आरक्षणावर गप्प का? मंत्री विखेंचा थोरातांवर थेट निशाणा
दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या आदेशामुळे अस्वस्थ असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक होणार आहे. तर 9 सप्टेंबर रोजी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली शासनस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.