आनंदाची बातमी! टॅरिफचे नुकसान भारत काढणार भरून; 135 अब्ज डॉलरच्या व्यापाराची संधी

Modi Trump

Donald Trump jolted as India pushes $135 billion trade without tariffs : टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध बिघडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प भारताला सातत्याने टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावत आहेत.

‘….तर तुमच्याकडे बघतो’; लक्ष्मण हाकेंची अजित पवारांना धमकी? आरक्षणावरून राजकारण तापलं….

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारतावर नाराज आहेत कारण, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो. भारतावर या कारणासाठी टॅरिफ लावला असल्याचे स्पष्ट सांगताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. फक्त एवढेच नाही तर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले, तर आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ (Tariffs) लगेचच काढू असे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर त्याचा थेट परिणाम झालाय.

मृत्यूशी झुंज ठरली अपयशी; PSI परीक्षेत अव्वल आलेल्या पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी अंत

भारत नुकसान भरून काढणार

भारताने देखील आता हे नुकसान (Tariffs) भरून काढण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत. भारत आता असा निर्णय घेणार आहे की, ज्यामुळे होणारे नुकसान आरामात भरून निघणार आहे. भारताला कोणत्याही टॅरिफशिवाय (Tariffs) 135 अब्ज डॉलर्सचा व्यापार करण्याची मोठी संधी मिळणार आहे. यावर चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होऊ शकतो. हा अमेरिकेच्या (Donald Trump) टॅरिफनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासाच म्हणावा लागेल.

ब्रेकिंग! छगन भुजबळ कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाच्या नव्या जीआरला आव्हान?

मुक्त व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप

रिपोर्टनुसार, भारत आणि युरोपियन युनियन (European Union) पुढील महिन्यात त्यांच्या महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराला (FTA) लवकरच अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन महत्त्वाच्या बैठका घेतील. यादरम्यान नियम, बाजारपेठ प्रवेश, वाइन आणि दुग्धजन्य पदार्थांवरील शुल्क या क्षेत्रातील मतभेद दूर होतील. जर यावर एकमत झाले तर या वर्षी करार पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि यामधून भारताला मोठा फायदा आणि टॅरिफमुळे (Tariffs) होणारे नुकसान भरून निघणार आहे.

या निजामाच्या अवलादींना ओबीसीतून… नवनाथ वाघमारेंनी जरागेंना ललकारलं

युरोपियन कमिशनच्या (European Union) आयुक्त क्रिस्टोफ हॅन्सन आणि व्यापार प्रमुख मारोस सेफकोविक हे भारताच्या दाैऱ्यावर असणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस एफटीएवर (FTA) दोन्ही बाजूंनी सह्या केल्या जातील. अमेरिकेने (Donald Trump) लावलेल्या टॅरिफमुळे (Tariffs) भारताच्या काही क्षेत्रामध्ये मोठे नुकसान झाले असून व्यापारी चिंतेत आहेत. मात्र, आता यातून मार्ग काढण्यासाठी भारताने मोठी योजना आखली आहे. भारताने हे दाखवून दिले की, काहीही झाले तरीही भारत कोणासमोरही (Donald Trump)हात पसरवणार नाहीत. आधीही अमेरिकेचा दबाव असतानाही भारताने काही महत्वाचे करार रशियासोबत केलेले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube