“जाहीर दिलगिरी” पण मूळ खलनायकाचे अखेर रंगमंचावर प्रगटीकरण! ‘त्या’ वक्तव्यावर विश्वास पाटलांची माफी

Vishwas Patil

Vishwas Patil Apologized for his statement about Reservation : साहित्यकार, माजी प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील यांनी आरक्षणावरून ज्या जातींना पुर्वीपासून आरक्षण आहे. त्यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून आरपीयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पाटील यांना माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून एक पोस्ट करत माफी मागितली आहे. तसेच त्यांनी यावेळी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं देखील म्हटलं आहे.

काय म्हणाले विश्वास पाटील?

विश्वास पाटील यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “जाहीर दिलगिरी” आणि मुद्दाम धोक्याचा इशारा ! मूळ खलनायकाचे अखेर रंगमंचावर प्रगटीकरण! चार-पाच दिवसा मागे प्रशांत कदम यांच्याशी मी हैदराबादच्या गॅझेट संदर्भात मुलाखत देताना माझ्या तोंडातील दोन वाक्य “कटपेस्ट” करून मला दलित विरोधी ठरविण्याचा बादरायण प्रयत्न काही साहित्यिकांनी चालवला आहे. जे मी माझ्या वाट्याला आलेल्या दोन अनुभवाविषयी, ते सुद्धा पर राज्यातल्या आमच्याच कृषक समाजातील दाखलाधारक अधिकाऱ्यांच्या अनुभवाबद्दल बोललो होतो. ज्यामध्ये मागास वर्ग किंवा अन्य कोणत्या जातीजमातीचा अधिक्षेप करण्याचा माझा स्वप्नातही विचार नव्हता. पण तरीही जर काही मंडळींना तसे वाटत असेल तर त्याबाबत जाहीर माफी मागण्यास मला काहीच दुःख वाटत नाही.

आमदार रोहित पवारांनी मंत्री बावनकुळेंची केली कोंडी, ‘ते’ आव्हान स्वीकारत दिलं प्रतिआव्हान

माझ्याच गावशिवचे काही पत्रकार, लेखक गेली पंधरा-वीस वर्ष माझ्या आणि माझ्या कुटुंबांच्या विरोधी पुन्हा पुन्हा कारस्थाने रचत आहेत. त्यातील मूळ कारस्थानी खलनायकाने माझ्याबाबत जातीय तेडीचे कारस्थान उभा करून माझ्या प्रतिमेचे पूर्ण खच्चीकरण करण्याचा अखेरचा डाव टाकला. तोही फसल्यामुळे संबंधिताला विंगेतून अखेर रंगमंचावर धावत यावे लागले.

कोणीही अण्णाभाऊंच्या राष्ट्रीय योगदानाची दखल घेतली नाही

माझे अण्णा भाऊंच्या बाबतचे संशोधन, माझ्या विरोधात राळ उठवू पाहणाऱ्या या गटातील कोणीही वाचलेले नाही. मी अण्णांची योग्यता ही बंगाली लेखिका महाश्वेता देवी आणि तमिळ लेखक जयकांतन यांच्या एवढी, किंबहुना त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कशी आहे हे दाखवून दिले आहेच. शिवाय देशाच्या स्वातंत्र्याच्या पायरीवर भारतीय महानगरीय साहित्याचे अण्णाभाऊ हे उद्गाते कसे होते. हे भारतातील पाच पाच महानगरामध्ये तेव्हा लिहिल्या गेलेल्या बंगाली हिंदी कन्नड तमिळ अशा सर्व भाषांचा अभ्यास करून नवे प्रमेय मांडले आहे. आता गेल्या चार दिवसात जे साहित्यिक किंवा त्यांचे गुरु या सर्वांनी महानगरीय साहित्यावर प्रबंध लिहिले आहेत. चर्चा घडवून आणले आहेत. पण यापैकी महानगरीय साहित्याबाबत कोणीही अण्णाभाऊंच्या राष्ट्रीय योगदानाची दखल कधीच घेतली नाही. नव्हे मराठी महानगरीय साहित्यात सुद्धा त्यांच्या नावाचा कधी साधा उल्लेख केला नाही.

“नागपुरात महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढाई लढणार…”, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक

काहीजण म्हणतील. पाटील चलाख आहेत. त्यामुळेच त्यांनी आत्ताच अण्णाभाऊ हा विषय निवडला ? “क्रांतीसुर्य” ही माझी 1983 मध्ये, पंचविशीच्या आत लिहिलेली कादंबरी. ज्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि क्रांतिसिंह नाना पाटील हे दोघे स्वतःला एकमेकास बंधू कसे मानत. त्या दोघांचे संसदेतील व संसदेबाहेरील कार्य व सामाजिक चळवळ याबाबत व्यक्तिरेखन केले आहे. माझ्या ऐन तिशीमध्ये प्रकाशित झालेली “झाडाझडती”, तिचे सशक्त दलित नायक खैरमोडे गुरुजी होते. माझा आरंभीचा साहित्यिक प्रवासच मुळी प्रा. केशव मेश्राम, सदा कराडे, सुहास सोनवणे आणि वामन होवाळ यांच्या सहवासात वृद्धिंगत झाला. वामनरावांची आणि माझी मैत्री तर सर्वांनाच माहित आहे.

यश चोप्रा फाउंडेशनकडून मीडिया शिष्यवृत्ती! मजूरांच्या मुलांना मिळणार 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत

वारणेच्या खोऱ्याला अण्णाभाऊंनी भारतीय साहित्यात अमर बनवले. त्याच वारणेच्या काठावर माझा जन्म झाला. सामान्यता दुसऱ्याबद्दल असुया आणि मत्सर बाळगण्याचे जगामध्ये कोणाला काहीच कारण नसते. मात्र तुमच्या प्रगतीबाबत तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, संबंधितांना आणि गाव परिसरातील मंडळींनाच खरा पोटशुळ उठतो हे जागतिक संशोधनातून सिद्ध झालेल आहे. तशीच काही वारणा काठची स्वतःलाच पुरोगामी समजणारी लेखक पत्रकार कवी मंडळी गेली अनेक वर्ष माझ्या राशीला लागली आहेत.

कुटील खलनायकाने मला आजन्म , अस्वस्थ व बेचैन ठेवले

त्यापैकी एका कुटील खलनायकाने माझ्या नातेवाईकांची ढाल समोर करून मला आजन्म , अस्वस्थ व बेचैन ठेवण्याचा अविरत उद्योग चालवला आहे. त्यासाठी मुख्यत: बुद्धिमान परंतु तीव्र भावनाप्रधान असणाऱ्या माझ्या भावाचा त्याने प्रथमपासून कौशल्याने उपयोग करून घेतला. माझ्या निवृत्तीच्या वेळी माझ्यावर वृत्तपत्र बदनाम मालिका सुरू करण्यासाठी ही प्रवृत्ती पहिल्यांदा “महाराष्ट्र टाइम्स” मध्ये खूप प्रयत्न करत होती. (ज्या घटनेचे सर्व साक्षीदार सुदैवाने हयात आहेत.) नंतर तो इतर वर्तमानपत्राकडे वळला. त्या काळात प्रिंट मीडिया आणि टीव्हीचा वापर करून मला माझ्या कुटुंबीयांसह हैराण करून सोडले.

https://www.facebook.com/100002568298521/posts/24366267623042175/?rdid=fSPuyyYBh0uRj9On#

निवृत्तीनंतर दहा दिवसाच्या आत विश्वास पाटील यांना त्यांच्या कुटुंबीयांसह मी गजाआड घालणार असे ह्या पुरोगामीचे स्वप्न होते. त्यासाठी स्वतःहून स्वतःचाच “पुरोगामी तोंडवळा” निर्माण केलेला हा त्रस्त गृहस्थ प्रत्येक माध्यमाच्या कार्यालयात खेट्या घालत होता. एवढेच नव्हे तर विधानसभा, मंत्रालय, अनेक राजकीय पक्षांचे अनेक बडे नेते, माझे अनेक वरिष्ठ सचिव (ज्यांचे आणि माझे 20 वर्षांचे भावांसारखे संबंध होते. त्यांना सुद्धा पुन्हा पुन्हा भेटून माझ्याबद्दल दूषित करण्याचा कौशल्याने डाव साधला.), केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, पोलीस यंत्रणा याने असा एकही प्लॅटफॉर्म सोडला नव्हता. एकदा नव्हे तर अनेकदा हा कुठे कुठे आणि कसा कसा फिरत होता याचे सज्जड पुरावे आहेतच.

Navya Nair : सावधान! केसांत गजरा माळताय? लाखोंचा फटका बसू शकतो…

मला भारतीय स्तरावर मिळालेले चार नॅशनल अवॉर्ड्स, आसामच्या जनतेने दिलेला तीन लाखांचा “इंदिरा गोस्वामी पुरस्कार”, श्रेष्ठ बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांनी “देश” सारख्या विख्यात पाक्षिकांत माझ्यावर स्वतंत्र लेख लिहिणे, अमिताव घोष सारख्या आंतरराष्ट्रीय साहित्यिकाने माझा वेळोवेळी गौरव करणे.( तीन महिन्यांपूर्वीच लोकसत्तेमध्ये श्री.घोष यांची मुलाखत आली आहे. ज्यामध्ये त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केल्याचे छापून आले आहे.) माझ्या लेखन श्रमावर मिळणाऱ्या यशाबाबत हा गृहस्थ कायमचा त्रस्त आहे.

रोहित पवार जी, …अन्यथा राजकीय संन्यास घ्या ; बावनकुळे रोहित पवारांना असं का म्हणाले?

आता “ज्ञानपीठ” चा बागुलबुवा उभा करणाऱ्या या मनुष्यास माहित नाही का ? 1993 मध्ये नरसिंहराव अध्यक्ष असताना “ज्ञानपीठाने” पानिपत हिंदीमध्ये आणली. शिवाय माझ्या एकूण आठ कलाकृती भारतीय ज्ञानपीठने हिंदीमध्ये प्रकाशित केले असून त्यापैकी अनेकांच्या पंधरा-पंधरा आवृत्ती प्रकाशित झाले आहेत. ज्या “ज्ञानपीठा”ने मला भारतभर पोचवले, ज्या मंदिरात माझा चार दशकापूर्वीच प्रवेश झाला आहे. त्याची भीती तुम्ही आता कशासाठी निर्माण करता ? या द्वेषाने पछाडलेल्या प्रवृत्तीने आमचे घर फोडले. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या स्त्रिया विभक्त झाल्या. घरामध्ये परस्परावर माया करणारी लहान मुले सुद्धा एकमेकापासून तोडली गेली. ह्या कुटील काळकुट्याने काय मिळवले ?

नगर-मनमाड रस्त्यावरून तनपुरे आक्रमक! अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, ठेकेदारांवर कारवाईची मागणी

यानेच सर्वत्र आदळाआपट करून वर्तमानपत्रातून माझ्या विरोधात बदनामीच्या मालिका हुशारीने राबवल्या. एखाद्या बड्या वर्तमानपत्रामध्ये एका लेखकाबाबत तेही दोन-तीन महिन्यात 65 डबल कॉलम बातम्या आणण्याचे विषारी सामर्थ्य याच्यापेक्षा दुसऱ्या कोणाकडे असू शकते? यानेच चौकशीचा फार्स उभा केला. हेच सारे आरोपाचे आणि चौकशीचे मुद्दे नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या वेळी माझ्या नातलगानी लेखी पत्र लिहून महामंडळाला कळवले होते. तेव्हा पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मला कोणतीही चौकशीची नोटीस आलेली नाही, असे मी जाहीरपणे सांगितले होते.

ऐश्वर्य ठाकरेचा डबल डेब्यू; ‘पिजन कबूतर’ गाण्याने इनिंगला धमाकेदार सुरुवात

माझ्या लेखनाची प्रतवारी ही कवी कुसुमाग्रज, वसंत कानेटकर , शांता शेळके, ज्येष्ठ हिंदी कादंबरीकार मृदुला गर्ग अशा अनेक बड्या साहित्यिकांनी माझ्या साहित्यावर स्वतंत्र लेख लिहून ठरवली आहे. मायमराठीच्या बक्कळ आशीर्वादाने भारताच्या नऊ भाषेमध्ये माझा वाचक वर्ग पसरला आहे. कन्नड मध्ये 13, हिंदी आणि इंग्रजी होऊन मध्ये 12 हून अधिक माझे ग्रंथ भाषांतरित होऊन त्यापैकी अनेकांच्या आवृत्त्या निघाल्या आहेत.. मी माझ्या वाचकांशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे माझ्या लेखनाची प्रतवारी या स्वयंघोषित पुरोगामीत्वाचा मुखवटा धारण करणाऱ्या कोण्या त्रस्त जीवाने करू नये. असेच मला मनापासून वाटते.

आनंदाची बातमी! टॅरिफचे नुकसान भारत काढणार भरून; 135 अब्ज डॉलरच्या व्यापाराची संधी

पुरोगामीत्वाच्या आणि नैतिकतेच्या दर्पणात डोकावताना प्रत्येकाने आपला कागदोपत्री उपलब्ध असलेला गतइतिहास सुद्धा विसरायचा नसतो. हा दीर्घ खुलासा करण्याचे कारण असे की, ही घातक प्रवृत्ती यापुढे सुद्धा गप्प बसणार नाही. माझ्या बदनामीचे षडयंत्र पुन्हा रचत राहणार आहे. समाज माध्यमाचा गैरवापर करणे, खोटे अकाउंट तयार करून दुसऱ्याला बदनाम करणे शिव्याशाप देणे हे चालूच राहणार आहे. त्यामुळे माझ्या वाचकांनी तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेनेही अजिबात विचलित होऊ नये. कोणा भुरट्यांच्या आणि वाटमाऱ्यांच्या गैरप्रचाराला व त्यांनी सतत चालू ठेवलेल्या कारस्थानांना बळी पडू नये, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती. विश्वास पाटील. अशा शब्दांत विश्वास पाटील यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube