परभणीतील हिंसाचाराला राज्य सरकार जबाबदार? सुषमा अंधारेंनी केला गंभीर आरोप…
Sushma Andhare Reaction On Parbhani Combing Operation : परभणीमध्ये (Parbhani) एका अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अपमान केल्याने मोठा हिंसाचार उसळला. या काळात अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची (Sushma Andhare) प्रतिक्रिया समोर आलीय. त्या म्हणाल्या की, परभणीत कालपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. राज्याला अजूनही गृहमंत्री लाभलेले नाहीत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झालाय. अशी घटना घडण्याला कारणीभूत इथली पोलीस व्यवस्था आणि गृह खातं असल्याचं अंधारे म्हणाल्या आहेत.
काकांचा आज वाढदिवस; पुतण्या सपत्निक दिल्लीतील निवासस्थानी दाखल, भेट होणार का?
सुषमा अंधारे म्हणाल्या की, परभणीमध्ये (Parbhani News) काल संध्याकाळपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. मुळात 20 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. 23-24 तारखेला काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेले नाही. त्यामुळे राज्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कोणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झालाय.
परभणी हा अत्यंत संवेदनशील एरिया आहे. आंबेडकरी चळवळीतील सगळ्या पॅंथरांचं निवासस्थान परभणीमध्ये आहे. अशा परिस्थितीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती (Parbhani Combing Operation) उद्धस्त केली जात असताना त्याची प्रतिक्रिया येणं अत्यंत सहज स्वाभाविक होतं. त्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी जो बंद पुकारलेला होता, अशी परिस्थितीमध्ये त्या बंदला प्रतिसाद देणं अपेक्षित होतं. परंतु जेव्हा ती घटना घडली. तेव्हा बंदला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी संतप्त आंबेडकरी अनुयायांनी काही दुकानं बंद होण्यासाठी पावलं उचलली. अर्थात त्याचं समर्थन करता येत नाही.
अशी घटना घडण्याला कारणीभूत इथली पोलीस यंत्रणा आहे. इथलं गृहखातं आहे. मात्र गृहखातं असं का वागतं, कारण गृहखात्याला कोणी निर्देश देणारा मंत्रीच अस्तित्वात नसेल तर करायचं काय? अशा सगळ्या परिस्थितीत कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा जर आंबेडकरी अनुयायांचं भविष्य अन् आयुष्य उद्धस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यापेक्षा कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली घडलेल्या पिढ्या बरबाद करण्याचा निषेध व्यक्त करतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.