पुण्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे मिळणार, अजितदादा अन् चंद्रकांत पाटलांसह ‘या’ दोन आमदारांचे नाव चर्चेत…
Maharashtra Cabinet expansion : विधानसभा निवडणुकीनंतर आज नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion) होणार आहे. पुण्यात कोणा कोणाला मंत्रिपदासाठी संधी मिळणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुकांनी नागपुरात (Nagpur) तळ ठोकला असून भाजपकडून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माधुरी मिसाळ तर राष्ट्रवादीकडून अजित पवारांसह दत्तात्रय भरणे (Dattatray Vithoba Bharne) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
‘….त्यामुळे आमचा सीएम, शिंदेंनी नाराज असण्याचं कारणच नाही; अमित शाह स्पष्टच बोलले
पुणे जिल्ह्यात 21 आमदारांपैकी पैकी 19 आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळं पुणे जिल्ह्याला मंत्रिमंडळात चांगले प्रतिनिधित्व मिळणार असल्याचे बोललं जातंय. गेल्या विधानसभेत पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत पाटील असे तीन मंत्री होते. आताही अजितदादा आणि चंद्रकांत पाटील यांचं नाव मंत्रिपदाच्या चर्चेच आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता आहे.
वळसे पाटलांऐवजी दत्तात्रय भरणेंच्या नावाची चर्चा
दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अजित पवार गटातील एका आमदाराला मंत्रीपदाची संधी मिळू शकते. त्यांच्या गटाचे जिल्ह्यात आठ आमदार आहेत. नव्या आमदाराला संधी देण्याचा प्रस्ताव पक्षापुढे आला आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांचे नाव मागे पडले आहे. वळसे पाटील यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय भरणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
नितेश राणे, पंकजा मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन, भाजपकडून आणखी कोण घेणार शपथ? अन् कुणाचा पत्ता कट?
तर आज सकाळपासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत संभाव्य मंत्र्यांनाही फोन केले जात आहेत. भाजपकडून पुण्यातून मंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना फोन आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
यासोबतच पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनाही भाजप पक्षश्रेष्ठींनी फोन केल्याचं बोलल्या जातंय. त्यामुळे त्यांच्याही गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ त्यांच्यावर पडण्याची शक्यता आहे. तर भोसरीतून तिसऱ्यांदा आमदार झालेले महेश लांडगे यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.मात्र अद्याप लांडगेंना पक्षश्रेष्ठींचा फोन आला नाही.
दरम्यान, भाजपला 22, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपकडून मंत्रिपदासाठी आतापर्यंत कोणाला फोन-
नितेश राणे
शिवेंद्रराज भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे
माधुरी मिसाळ