Rahul Gandhi यांचं वंचित बहुजन आघाडीच्या ‘त्या’ पत्राला उत्तर, पत्रात नेमकं काय म्हटलंय?
Rahul Gandhi : मुंबईमध्ये (Mumbai)शिवाजी पार्कवर (Shivaji Park)वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan aghadi)आज (दि.25) संविधान सन्मान महासभा होणार आहे. काही दिवसांपासून या महासभेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या कार्यक्रमासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना निमंत्रण दिलं होतं. त्यावर राहुल गांधी यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने महासभेसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी कळवल्याचे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे (Siddharth Mokle)यांनी सांगितले आहे.
Sushama Andhare : नगरमध्ये सुषमा अंधारेंच्या फोटोला फासलं काळं, नेमकं कारण काय?
सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या संविधान सन्मान महासभेसाठी आम्ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवलं होतं. मात्र कार्य बाहूल्यामुळे, पूर्वीचे काही कार्यक्रम ठरलेले असल्यामुळे ते या महासभेस उपस्थित राहू शकत नाही असे त्यांनी आम्हाला कळवले आहे.
‘ब्रम्हदेव जरी आला तरी सांगोल्यातूनच लढणार’; दीपक साळुंखेंनी वाढवलं शहाजी पाटलांचं टेन्शन
संविधान सन्मान महासभा आणि वंचित बहुजन आघाडीला राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल त्यांनी पत्रात दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या बदल्यात उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसमधील दुसऱ्या कुणाचेही नाव त्यांनी सुचवलेलं नाही. आज होणाऱ्या संविधान सन्मान महासभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचं पत्र समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे.
राहुल गांधी यांच्या पत्रात म्हटलं आहे की, संविधान सन्मान महासभेच्या निमंत्रणासाठी मी तुमचे आभार मानू इच्छितो. संविधान दिनाच्या स्मरणार्थ महासभा आयोजित केल्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अभिनंदन करू इच्छितो. आज आपण एका गंभीर मार्गावर आहोत. गेल्या नऊ वर्षांत आपण आपल्या घटनात्मक मूल्यांवर सातत्याने हल्ला होत असलेला पाहिला आहे.
सध्याच्या स्थितीत या संविधानिक मुल्याचे रक्षण करणे, ही आपली महत्त्वाची जबाबदारी बनली आहे. दुर्दैवाने, माझ्या सध्या सुरू व्यस्त कामकाजामुळे मी आजच्या संविधान सभेला उपस्थित राहू शकणार नाही. मी वंचित बहुजन आघाडीला भावी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, असेही राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.