महादेव जानकरांचे पुतणे लोकसभेच्या रिंगणात, माढ्यातून निवडणूक लढणार असल्याची केली घोषणा

महादेव जानकरांचे पुतणे लोकसभेच्या रिंगणात, माढ्यातून निवडणूक लढणार असल्याची केली घोषणा

Swaroop Jankar will contest Madha : सध्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे (Madha Lok Sabha Constituency) सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून  (Mahavikas Aghadi) प्रवीण गायकवाड यांचं नाव चर्चेत आहे. अशातच आता स्वरुप जानकर (Swaroop Jankar) यांनी आपण माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकाही केली.

Amar Singh Chamkila चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; दिलजीत-परिणीतीचा रोमॅंटीक अंदाज 

भाजपने लोकशाही कुमकुवत केली
स्वरुप जानकर यांनी एक प्रसिध्द पत्रक जारी केलं. त्यात त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने लोकशाही व्यवस्था कुमकुवत केली. शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. त्याचा गंभीर परिणाम माढा लोकसभा मतदारसंघात पहायला मिळत आहे. दहशतीच्या जोरावर विरोधी पक्षाला उमेदवार मिळू न देण्याचे षढयंत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भक्कम वैचारिक भूमिका घेऊन माढा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करत असल्याचे त्यांनी म्हटलं.

‘कृतीतून काम करणाऱ्यांवरच जनतेचा विश्वास’; उमदेवारी जाहीर होताच पवारांची टीका 

संविधानिक मूल्यांना प्राधान्यक्रम देण्याची भूमिका घेत असताना खात्रीपुर्वक माढा लोकसभा भाजपमुक्त करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सांविधानिक मूल्यांच्या रक्षणाची भुमिका मांडण्याबरोबरच मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न सोडविण्याचे अभिवचन जनतेला देणार आहे. विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या शोषित – वंचित घटकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहे.

ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात भीतीचे वातावरण तयार केले आहे. लोकशाही मोडीत काढून हुकुमशाहीच्या दिशेने वेगवान पावले टाकली जात आहेत. त्यामुळं प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन भाजपला रोखण्यासाठी माढा मतदारसंघातील जनतेला आवाहन करायचे ठरवले असल्याचं स्वरुप जानकर यांनी सांगितलं.

माढ्यात आयटी, ईडीचा वापर
आजमितीला माढा लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार आणि दुसऱ्या फळीतील ९० टक्के पुढारी भाजपच्या बाजूने आहेत, मात्र जनता भाजपच्या विरोधात आहे. भाजप सरकारने यापुर्वीच दोन साखर कारखानदार असलेल्या आमदारांना आयटी, ईडीची भीती दाखवून वळवले आहे. विरोधात उरलेल्या नेत्यांनाही ईडीची धमकी दिली जात आहे. मतदारसंघातील लोकशाहीचे वातावरण नष्ट करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरूअसल्याची टीका त्यांनी केली.

14 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज
माझ्या राजकीय विचारांवर फुले- शाहू- आंबेडकर- कांशीराम यांचा प्रभाव आहे. त्यामुळे या विचारधारेला अनुसरून निवडणुकीतील भूमिका निश्चित करणार आहे. फुले- शाहू- आंबेडकरांचे नाव घेणारे पक्ष आणि उमेदवार माढ्यातही असतील, पण त्यांच्या कृतीशीलतेचा विचार करून पक्ष की अपक्ष, याचा निर्णय आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिलला घेणार आहे. त्याचदिवशी उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

जानकरांची परभणीतून लढण्याची भूमिका पटली नाही
ते म्हणाले, माझे चुलते महादेव जानकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा ऐवजी बारामतीत उभा राहण्याची घेतलेली भुमिका मला पटली नव्हती. कारण, जानकर यांना माढ्यात विजय शक्य होता, असे माझे मत होते. आता त्यांना माढ्यात वातावरण चांगले होते, पण त्यांनी परभणीत जायचा निर्णय घेतला. ही भुमिका मला पटलेली नाही, असं स्वरुप जानकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube