‘कृतीतून काम करणाऱ्यांवरच जनतेचा विश्वास’; उमदेवारी जाहीर होताच पवारांची टीका

‘कृतीतून काम करणाऱ्यांवरच जनतेचा विश्वास’; उमदेवारी जाहीर होताच पवारांची टीका

Jalgaon Loksabha : मत मागण्यांपेक्षा कृतीतून काम करणाऱ्यांवरच जनतेचा विश्वास असल्याची टीका जळगाव लोकसभेचे (Jalgaon Loksabha) ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार (Karan Pawar) यांनी केली आहे. दरम्यान, जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांच्यासह करण पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. प्रवेश करताच ठाकरे गटाकडून करण पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

‘भूल भुलैया 3’ मध्ये माधुरीची एंट्री; विद्या बालनसोबत साकारणार भुताची भूमिका, कियाराचा पत्ता कट?

पवार म्हणाले, मला जळगाव मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उन्मेश पाटील यांचा मोठा सपोर्ट मिळालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी जळगावातून एका तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जळगावातील तरुण वर्ग माझ्यामागे उभे राहुन मला निवडून देतील. शेतकरी, विम्यासाठी उन्मेशदादांनी रस्त्यावर उतरुन विमा मिळवून दिला आहे. बलून बंधारा असो व तापी नदीचा प्रश्नावर अनेकदा संघर्ष केलायं. मते मागण्यापेक्षा जो कृतीतू काम करेल त्याच्यावरच जनता विश्वास ठेऊन निवडून देणार असल्याचं करण पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Ashok Chavan News :”और किसीको देखने की जरुरत नही है”; अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी

सध्या जळगावच्या राजकारणात विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. जिल्ह्यात सध्या बदल्याचंच राजकारण सुरु आहे. याला गाडा त्याला पाडा अशीच विरोधकांची भाषा आहे. या पलीकडे राजकारणाला वेगळी दिशा देण्याची गरज त्यासाठीच मी उमेदवारी करीत आहे. माझ्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत, उन्मेश पाटील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या शिफारसीमुळेच मला उमेदवारी मिळाली असल्याने मी त्यांचा आभारी असल्याचंही करण पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, करण पवार हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. जळगावातील अनेक तालुक्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे. यासोबत त्यांचे काका सतिश पाटील यांचा पाठिंबा आणि विशेष म्हणजे उन्मेश पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. या दोन्ही गोष्टींमुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता पाटील यांना तगडं आव्हान करण पवार हे देऊ शकतात. त्यामुळेच उद्धव ठाकरेंकडून पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज