माढ्यात CM शिंदेंना धक्का! बड्या नेत्याचा जय महाराष्ट्र; शरद पवारांचे हात करणार बळकट

माढ्यात CM शिंदेंना धक्का! बड्या नेत्याचा जय महाराष्ट्र; शरद पवारांचे हात करणार बळकट

Madha Shivsena leader Sanjay Kokate Resignation : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा निर्माण (Madha Lok Sabha Constituency) झाला आहे तर दुसरीकडे आता महायुतीलाही धक्का बसला आहे. हा धक्का एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेला बसला आहे. माढा शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी घडल्याने महायुतीची वाटचाल खडतर झाली आहे. या राजीनाम्यानंतर संजय कोकाटे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

वंचितने उमेदवारी देताच रमेश बारसकरांवर मोठी कारवाई! शरद पवार गटाकडून हकालपट्टी

संजय कोकाटे येत्या शुक्रवारी आपल्या समर्थकांसह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोकाटे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्याविरोधात शड्डू ठोकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीने माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले आहे. महायुतीचे सर्व घटकपक्ष त्यांच्यासाठी प्रचार करणार आहेत. मात्र त्याआधीच शिंदेसेनेला धक्का बसला आहे.

या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. महायुतीने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपातील मोहिते गट कमालीचा नाराज झाला आहे. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, हा प्रवेश अजून झालेला नाही. दुसरीकडे भाजपकडूनही मोहित पाटलांची मनधरणी केली जात आहे. अशा परिस्थितीत संभाव्य डॅमेज कंट्रोलच्या या प्रयत्नांत कोकाटे यांच्या रुपाने एकूणच महायुतीला जबर दणका बसला आहे.

माढ्यात जानकरांची एन्ट्री! माढा ‘रासप’ला द्या, थेट शरद पवारांकडे मागणी

दरम्यान, धैर्यशील मोहितेंकडून महायुतीकडे उमेदवारीची मागणी केली जात होती. परंतु, भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा मैदानात उतरवले. यानंतर मोहिते पाटील कुटुंबीय कमालीचे नाराज झाले होते. त्यांच्याकडून भाजपविरोधात रान उठवण्यास सुरुवात झाली. तरी देखील त्यांनी काही दिवस वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. दुसरीकडे शरद पवाारांनाही या मतदारसंघात मनासारखा उमेदवार मिळत नव्हता. मध्यंतरी महादेव जानकर यांनी त्यांची भेट घेतली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube