Madha Lok Sabha : राष्ट्रवादीची धाकधुक वाढली; आमदार शिंदे बंधुंची महत्त्वाच्या बैठकीला दांडी

Madha Lok Sabha : राष्ट्रवादीची धाकधुक वाढली; आमदार शिंदे बंधुंची महत्त्वाच्या बैठकीला दांडी

माढा : एकेकाळी बालेकिल्ला अन् शरद पवार यांचा मतदारसंघ असलेला माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. नुकतीच मुंबईत या मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. यात मतदारसंघातील पक्षाची ताकद, कमी असलेल्या ठिकाणी करायच्या उपाययोजना, मतांची गणिती अशा विविध गोष्टींचा आढावा घेण्यात आला. याशिवाय फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली. (Madha Lok Sabha election 2024 NCP Meeting MLA Sanjay Shinde and Baban Shinde Absent)

एका बाजूला राष्ट्रवादीच्या गोटात बैठकांचे सत्र अन् मतदारसंघ काबिज करण्यासाठी रणनीती तयार होत असतानाच या बैठकीला माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार संजय मामा शिंदे यांनी दांडी मारली होती. त्यांच्या या अनुपस्थितीची बैठकीत जोरदार चर्चा पाहायला मिळाली. इतकचं नाही तर सोलापूरचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे सुद्धा उपस्थित नव्हते.

Madha Loksabha : रामराजेंचे नाव एकमताने पुढे येताच पवारांची सावध प्रतिक्रिया

या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ,  छगन भुजबळ उपस्थित होते. तर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार राजन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार दिपक साळुंखे, माळशिरसचे नेते उत्तमराव जानकर, रामराजे निंबाळकर, प्रदेश सचिव लतीफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह पंढरपुरातील काही नेते या बैठकीला उपस्थित होते.

शिंदे बंधूंच्या मनात नेमकं काय चाललं आहे?

बबनदादा शिंदे हे सोलापूर जिल्हातील माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. १९९५ पासून सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहे. सोलापूर जिल्हात साखर कारखानदारी क्षेत्रातलं मोठं नाव त्यांना ओळखलं जात. बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे देखील करमाळा मतदार संघातून आमदार आहेत. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून बबनदादा शिंदे यांची ओळख आहे पण मागील काही दिवसापासून ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात आता शिंदे बंधूंच्या अनुपस्थितीने राष्ट्रवादीची धडधड वाढविली आहे.

हातकणंगलेत राजू शेट्टींची कोंडी; राष्ट्रवादीतून स्वतः जयंत पाटीलच उतरणार लोकसभेच्या मैदानात?

नुकतचं पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बबनदादा शिंदे थेट सत्ताधारी बाकावर म्हणजे भाजपच्या बाजूला बसलेले दिसून आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात उत्तरे देत होते, त्यावेळी अचानक बबनदादा शिंदे फडणवीसांच्या मागच्या बाकावर येऊन बसलेले दिसले. सभागृहात अध्यक्षांच्या उजव्या बाजूला सत्ताधारी आणि डाव्या बाजूला विरोधी पक्षाचे सदस्य बसलेले असतात. विधिमंडळ सदस्यांनी आपली जागा बदलली तरी ते आपली बाजू बदलत नाहीत. पण बबनदादा शिंदे हे सभागृहाचे जेष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना सभागृहाच्या प्रथा माहित आहेत. पण तरीही ते थेट सत्ताधारी बाकावर येऊन बसल्यामुळे चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.

बबनराव शिंदेंविरोधात सुरु आहे ई़डी चौकशी :

दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात आणि त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे यांच्याविरोधात ईडी चौकशी सुरु आहे. सुतगिरणीतील गैरव्यवहार आणि साखर कारखान्यातील ऊस उत्पादक सभासदाच्या नावे उचललेल्या कर्जाप्रकरणी ही चौकशी असल्याची माहिती आहे. माढ्याच्या उपळाईचे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी याबाबतची तक्रार केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube