Letsupp Exclusive : राज ठाकरे यांना मातोश्रीवर चहाचं निमंत्रण…

Sanjay Raut : ज्या हक्काने राज ठाकरे ((Raj Thackeray) वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत बोलतात, त्याच हक्काने मातोश्रीवर त्यांनी यावं, आम्ही मित्र म्हणून कधीही चहा घेऊ शकतो, असं खुलं निमंत्रण ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलंय. लेट्सअप मराठीच्या लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात संजय राऊत यांनी खास मुलाखत दिलीयं. यावेळी ते बोलत होते.
‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे ९९’ ला शुभेच्छा; राजकुमार हिरानी,आर. माधवन, शर्मन जोशी यांच्यासह रितेश देशमुखने शेअर केला ट्रेलर
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे जसे आमचे मित्र आहेत, तसेच राज ठाकरेही आमचे मित्र आहेत. त्यांचे वडिलही आमचे मित्र. राज ठाकरेंसोबत अनेक वर्षे गेली आहेत. आम्ही चहा प्यायला मित्र म्हणून कधीही जाऊ शकतो. हा राजकीय निर्णय नाही. माझ्या मुलीच्या लग्नाला राज ठाकरे आले होते. हा दोन भावांचा राजकीय प्रश्न आहे, पण कौटुंबिक नाही. आमच्यासोबत यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली, आम्ही त्याचं स्वागतच केलं, अजूनही करतो पण ज्यांनी शिवसेना फोडली त्यांच्यासोबत त्यांनी संबंध ठेऊ नये, असा सल्ला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिलायं.
पवारांमुळे मोदी तुरूंगात जाता जाता वाचले; राऊतांच्या खळबळजनक दाव्यानं राजकारण पेटणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपसोबत आहे, त्यांचा भाजपशी अनैतिक संबंध आहे. त्यांनी हा संबंध तोडला पाहिजे, हे सगळं थांबवलं पाहिजे, भाजप हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. उदय सामंत आधी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आता राज ठाकरेंची खिचडी खायला जात आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावलायं.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विलीनीकरणाचा विषय येत नाही, कारण राज ठाकरेंचा पक्ष वेगळा आहे. त्यांनी पक्ष स्थापन केलेला आहे. पक्ष स्थापन करुन चावलणं एवढं सोपं नसतं, त्यांची इच्छा आहे की एकत्र लढावं आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही प्रतिसाद दिलेला आहे. भविष्यात कळेलच . ज्या हक्काने राज ठाकरे वर्षावर जाऊन फडणवीसांशी बोलतात, त्या हक्काने त्यांनी मातोश्रीवर यावं. उद्धव ठाकरे त्यांचे मोठे भाऊ आहेत, उद्धव ठाकरे विशाल ह्रदयाचे आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, मनसेला निवडणुकीत कोणतंही यश न मिळाल्याने उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढवाव्यात, अशी भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे गटाकडून तसा प्रतिसादही मनसेला मिळत आहेत. अशातच आता संजय राऊतांनी राज ठाकरेंना मातोश्रीवर चहाचं निमंत्रण दिल्याने पुढील काळात राज ठाकरे हे निमंत्रण स्विकारुन मातोश्रीवर जातील की नाही? दोन्ही ठाकरे एकत्र येतील की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.