ब्रेकिंग! अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीतून मोठी घोषणा

ब्रेकिंग!  अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीतून मोठी घोषणा

Devendra Fadanvis Announces medical college for Ahilyanagar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडाळाची बैठक चौंडी येथे आयोजित करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह (Ahilyanagar) अनेक मंत्र्यांना निमंत्रित केले होते.

अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेजची घोषणा

अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर चित्रपट काढला जाणार आहे. अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज देण्यात येणार आहे. चौंडीचा तिर्थस्थळ म्हणून विकास केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अमित शाह अपयशी गृहमंत्री; पुढची परिस्थिती हाताळताना, संजय राऊतांनी केली ‘ही’ मोठी मागणी

विविध मंदिरांच्या विकासासाठी एकूण 5530 कोटी रुपयांचा आराखडा

आज चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक झाली. चोंडी येथे 681 कोटींचा आराखड्याला मान्यता दिली आहे. अखिल भारतीय तीर्थस्थळ म्हणून त्यांना विकसित करण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर 1862 कोटी, त्र्यंबकेश्वर221 कोटी, महालक्ष्मी मंदिर 1445, माहूरगड 829 कोटी रुपये असे एकूण 5530 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे.

Big Breaking : चार महिन्यात पालिका निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे फडणवीस सरकारला आदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय हॉस्पिटल, असं नाव या मेडिकल कॉलेजला देण्यात येणार आहे. यासोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरिता स्वतंत्र आयटीआय देखील तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महिला सक्षमीकरणाकरिता आदिशक्ती अभियान राबविण्याचं ठरवलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती केली जाणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीसाठी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याला देखील मान्यता दिली आहे, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आजच्या बैठकीत आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या कुंभमेळ्याचं संचालन करण्यासाठी कुंभमेला प्राधिकरण कायदा मंजूर केलेला आहे. यासोबत आपण आज अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने एक लोगो प्रकाशित केला आहे. एक डाक तिकीट जारी करण्यात आले आहे. एक प्रेरणा गीत देखील याठिकाणी जारी केलं असल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube