माढ्यातली गुडन्यूज पुण्यात.. रणजितसिंह मोहिते भाजपाच्या अधिवेशनात, विधानसभेचं गणित बदलणार?

माढ्यातली गुडन्यूज पुण्यात.. रणजितसिंह मोहिते भाजपाच्या अधिवेशनात, विधानसभेचं गणित बदलणार?

BJP Convention in Pune : माढा लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकर (Madha Lok Sabha) यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील कुटुंब नाराज झाले होते. थेट शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवली आणि विजय मिळवला. निवडणूक काळात आणि निवडणुकीनंतर रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपाच्या (BJP) मंचावर दिसले नव्हते. परंतु, आज पुण्यात वेगळंच (Pune News) चित्र पाहण्यास मिळालं. लोकसभा निवडणुकीत झालेले वाद बाजूला ठेवत रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपाच्या अधिवेशनात हजेरी लावली आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाचे विधानपरिषद आमदार असताना देखील मोहिते पाटील यांनी बंडखोरी केल्याने भाजपला मोठा फटका बसला होता. मोहिते पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान व नंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या स्टेजवर जाणे टाळले होते मात्र आज पुण्यामध्ये आयोजित अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

Hatkanangale Loksabha : धैर्यशील मानेंनी गड राखलाच! इचलकरंजीने तारल्याने 40 हजारांचा लीड 

रणजीत सिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र तसेच नुकतेच लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये जी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली होती ती विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहतील अशी शक्यता कमीच असल्याचं चित्र सध्याच्या राजकीय घडामोडींतून दिसून येत आहे.

Madha Loksabha : माढ्यात धैर्यशील मोहितेच, 5 हजार मतांनी घेतली आघाडी 

लोकसभा निवडणुकीत माढ्यासाठी भाजपकडून खेळ्या खेळण्यात आल्याचं दिसून आलं होतं, तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्याने शरद पवारांनीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरीस मोहिते पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करत चाल खेळली. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली होती. दोन्ही बाजूने आपल्या उमेदवारांसाठी मोठी ताकद लावण्यात आल्याचं प्रचारात दिसून आलं होतं. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी महायुतीचे रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube