Madha Loksabha : माढ्यात धैर्यशील मोहितेच, 5 हजार मतांनी घेतली आघाडी…

Madha Loksabha : माढ्यात धैर्यशील मोहितेच, 5 हजार मतांनी घेतली आघाडी…

Madha Loksabha : सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha) कडवी टक्कर सुरु असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे उमदेवार धैर्यशील मोहिते पाटील (dhairyasheel Mohite patil) यांनी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsingh Nimbalkar) यांना पिछाडीवर टाकलंय. दरम्यान, याच मतदारसंघात शरद पवारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलीच ताकद लावल्याचं दिसून आलं होतं.

Sanya Malhotra ठरली ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये ‘मिसेस’ साठी गौरव

माढा लोकसभेसाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यानंतर या चुरशीच्या लढतीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. अखेर आज सकाळच्या सुमारास मतमोजणी सुरु झाली असून सुरवातीला पोस्ट मतांची मोजणी करण्यात आलीयं. पोस्टल मतदान झाल्यानंतर पहिल्या फेरीत मतमोजणी सुरु झालीयं. पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडीवर आहेत. साधारणत 5000 मतांनी मोहिते पाटील आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात झालीयं दुसऱ्या फेरीत देखील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा अनोखा उपक्रम; समुद्र किनारी स्वच्छता करत दिला संदेश

देशभरात 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान पार पडलं असून राज्यातही पाच टप्प्यांत मतदान पार पडलं. शेवटच्या टप्प्यांतील मतदानानंतर अखेर आज मतमोजणी सुरु झालीयं. राज्यातील महत्वाच्या लढतीपैकी मानली जाणारी लढत म्हणजे माढा मतदारसंघाची आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोण बाजी मारणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यांत माढा लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं. पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज लढतींपैकी एक लढत म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातील धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित नाईक निंबाळकर यांच्यातील लढत आहे. याच मुख्य कारण म्हणजे मागील लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते पाटलांच्या शब्दावर माळशिरस-अकलूज तालुक्यातून लिड मिळालं होतं. आता एकेकाळी निंबाळकरांसाठी मदत करणारे मोहिते पाटील रिंगणात उतरल्याने माढ्याचा पुढचा खासदार कोण असेल? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीयं.

माढ्यासाठी भाजपकडून खेळ्या खेळण्यात आल्याचं दिसून आलंय, तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटल्याने शरद पवारांनीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरीस मोहिते पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करत चाल खेळली. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली. दोन्ही बाजूने आपल्या उमेदवारांसाठी मोठी ताकद लावण्यात आल्याचं प्रचारात दिसून आलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज