हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा अनोखा उपक्रम; समुद्र किनारी स्वच्छता करत दिला संदेश
Maharashtrachi Hasyajatra या कार्यक्रमातील अभिनेते-अभिनेत्री चर्चेत असतात. पृथ्वीक प्रतापने माहीम बीच या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अभिनेते आणि अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

त्याचबरोबर ते सोशल मीडियावर देखील तेवढेच सक्रिय असतात. यावेळी देखील या कार्यक्रमातील एका अभिनेत्याने असेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये दिसत आहे की, या अभिनेत्याने अनोखा उपक्रम राबवत एक सामाजिक संदेश दिला आहे.

हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याने मुंबईतील माहीम बीच या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले.
