Lok Sabha Election: माढ्यात शेवटच्या क्षणी ट्वीस्ट; धैर्यशील मोहितेंना भालके गटाचा पाठिंबा

Lok Sabha Election: माढ्यात शेवटच्या क्षणी ट्वीस्ट; धैर्यशील मोहितेंना भालके गटाचा पाठिंबा

Bhagirath Bhalke support Dhairyasheel Mohite Patil : माढा लोकसभा मतदारसंघात अनेक ट्वीस्ट बघायला मिळाले. उमेदवारी दाखल करण्यापासून ते पार मतदानाच्या एक दिवस आधी राजकीय घडामोडी घडत आहे. विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Patil) हे आधी मोहितेंचा प्रचार करत होते. ते आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी ताकद लावत आहेत. अभिजित पाटील भाजपबरोबर गेल्यानंतर विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी आता शेवटच्या स्टेजला पत्ते उघड केले आहे. भालके गटाने मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते (Dhairyasheel Mohite Patil) यांना सोमवारी पाठिंबा जाहीर केलाय.

अमेठी अन् रायबरेलीसाठी काँग्रेसचा स्पेशल प्लॅन : दोन सर्वात अनुभवी शिलेदार मैदानात

मोहिते कुटुंब हे भाजपबरोबर होते. पण त्यांचा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा तिकीट देण्यास विरोध केला. भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा रिंगणात उतरविले. नाराज धैर्यशील मोहिते यांनी शरद पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळविले. त्यामुळे येथे अटीतटीचा लढतीची परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक नेते आपल्याबरोबर घेण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये होते. माळशिरसचे स्थानिक धनगर नेते उत्तमराव जानकर हे मोहितेंबरोबर वैर विसरले. त्यांनी धैर्यशील मोहितेंना पाठिंबा दर्शविला. भाजपनेही ते आपल्याबरोबर असावे असे प्रयत्न केले.

वडेट्टीवारांचं ‘ते’ वक्तव्य महाविकास आघाडीला शेकणार? तर्कवितर्कांना उधाण

अभिजित पाटील यांनी धैर्यशील मोहिते यांना पाठिंबा दर्शविला. परंतु साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने साखर जप्तीवर कारवाई केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटलांना कारखान्याबाबत शब्द देऊन भाजपबरोबर आणले. अभिजित पाटील हे भाजपबरोबर गेले. त्यामुळे भगिरथ भालके गटाने धैर्यशील मोहिते यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी घडत असल्याने हा मतदारसंघ जोरदार चर्चेत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube