‘त्यांनीच माझ्यावर ही वेळ आणली’; भगीरथ भालकेंचे NCP सोडताना गंभीर आरोप

‘त्यांनीच माझ्यावर ही वेळ आणली’; भगीरथ भालकेंचे NCP सोडताना गंभीर आरोप

Bhagirath Bhalke : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवले होते, त्या विमानाने भालके केसीआर यांना हैदराबादला भेटायला गेले. त्यानंतर भालके बीआरएसमध्ये जाण्याची शक्यता प्रबळ झाली होती. दरम्यान, आज भालके यांनी 27 जून रोजी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार असल्याची असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने आपल्याला दुजाभावाची वागणूक देऊन आपल्यावर पक्ष सोडण्याची वेळ आणल्याचं मोठं वक्तव्य केलं. (It was the NCP itself that brought me time to join BRS.. Bhagirath Bhalke’s serious allegations while leaving NCP)

भगीरथ भालके यांनी बोलतांना सांगितले की, बीआएसमध्ये जाण्याची वेळ राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच माझ्यावर आणली. माझ्या वडिलांनी 2009, 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. जनता हाच पक्ष मानून भारत नाना जनतेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे गेले. जनतेनेही त्यांनाच पक्ष मानूण आशिर्वाद दिले. २००९ आणि २०१४ ला दुसऱ्या पक्षात असतांनाही वडिलांची पवारांवर निष्ठा होती. त्यांच्यानंतर मला पोटनिवडणुकीला समोरं जाण्याची वेळ आली. तेव्हा जनतेनं माझ्यावर मायेचं छत्र धरलं. मात्र, माझा पराभव झाला. ३६०० मतांनी माझा पराभव झाला. मात्र, भारत नाना भालके गेल्यानंतर पक्षाने आमच्यावर जे छत्र धरायला हवे होते, ते धरले नाही,असा आरोप त्यांनी केला.

Kiara Advani: कियारा आडवाणी प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवरुन चर्चांना उधाण ! 

ते म्हणाले, पोटनिवडणुकीत माझा पराभव झाला. त्यानंतरही मी पक्षाचं कामे करत राहिला. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार असतांना मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत करा, असं वारंवार सांगत होतो. मात्र, सरकारने कारखान्याला मदत केली नाही. आम्हाला दुजाभावाची वागणूक देण्यात आली…. बीआरएस हा शेतकरी, बहुजनांसाठी काम करणाऱ्या पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळेच आता बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी आता या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी आमची आहे, असे सांगून पवारांनी अप्रत्यक्षपणे पाटलांचे तिकीट निश्चित केले होते. त्यामुळे भगीरथ भालके नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान, भालके यांच्या नाराजीचं कारणं काहीही असलं तरी आषाढी एकादशीनिमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 27 जून रोजी पंढरपूरला भेट देणार आहेत. त्यावेळी भालके आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. भालके यांना पोटनिवडणुकीत एक लाखांहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे भालके यांनी पक्ष सोडल्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत बसू शकतो.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube