Kiara Advani: कियारा आडवाणी प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवरुन चर्चांना उधाण !

Kiara Advani: कियारा आडवाणी प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवरुन चर्चांना उधाण !

Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या तिचा आगामी सिनेमा ‘सत्यप्रेम की कथा’च्या (Satya Prem Ki Katha) प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमात कियारा अभिनेता कार्तिक आर्य़नसोबत (Karthik Aryan) झळकणार आहे. सोशल मीडियावर कियाराचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)


या फोटोवरून ती गरोदर असल्याची जोरदार चर्चा होत आहे. (Photo viral) शनिवारी कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जयपूरला आली होती. जयपूरमध्ये ते एका कार्यक्रमाच्या दरम्यान सहभागी झाले होते. या क्रार्यक्रमाचा एक फोटो सोशल मीडियावर (social media) प्रचंड धुमाकूळ घालत आहे. यातील एका फोटोत कियाराचा बेबी बंप दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे.

परंतु अभिनेत्रीने याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. कियाराच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका चाहत्याने विचारले की, ‘कियारा प्रेग्नंट आहे का?’ तर आणखी दुसऱ्याने सिद्धार्थला सांगावे लागेल अशी भन्नाट कमेंट करत आहेत.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

कियाराच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर तिचा आणि कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमा २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गजराज राव आणि सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वांसने केले आहे. कार्तिक ‘सत्यप्रेम’, तर कियारा ‘कथा’ची भूमिका साकारणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube