Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन
Raja Karale Passes Away : चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन झालं. आज सकाळी दहा वाजता पुण्यात मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक यांचे पुत्र होते. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. (Bhairu Pailwan ki jay fame Director Raja Karale Passes Away)
‘काँग्रेस की हिंदुत्व?, औरंगजेब की सावरकर?’ भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
प्रवीण कारळे यांनी अगदी लहान पणापासून चित्रपट सृष्टीतील बारकावे समजून घेतलेले होते. त्यामुळे अनेक आशयपूर्ण चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केले त्यामध्ये बोकड, भैरू पैलवान की जय, मानसन्मान, माझी आशिकी, ह्रदयात वाजे समथिंग हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच निधन झालं आहे. त्यामध्ये सुलोचना दीदी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा तांबे या देखील काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यात आता चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन झालं आहे.