Madha Lok Sabha : धैर्यशील मोहितेंना माढा अवघडच, कारणेही अनेक; निंबाळकरांची बाजू तगडी
Madha Lok Sabha Election Dhairyasheel Mohite Patil vs RanjitSingh Nimbalkar: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) व शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते (Dhairyasheel Mohite Patil) यांच्यामध्ये लढत होत आहे. ही जागा महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे मतदारसंघात दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जोरदार सभा होत आहे. या मतदारसंघात धैर्यशील मोहिते यांच्याविरोधात अनेक स्थानिक मुद्दे आहेत. त्यात संस्था बुडवून सर्वसामान्य ठेवीदार, शेतकऱ्यांना धैर्यशील मोहितेंनी फसविल्याचा आरोप आता भाजपकड़ून जाहीरपणे केला जात आहे.. रणजितसिंह निंबाळकरांविरोधात थोडासा रोष सुरुवातीला दिसला आहे. पण येथे त्यांच्या जमेच्या अनेक बाजू आहेत.
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्याचे खासदार असून, त्यांना भाजप पुन्हा तिकीट दिले आहे. ते सातारा जिल्ह्यातील फलटणमधील निंबाळकर राजघराण्याचे वशंज आहे. त्यांच्या उमेदवाराला सुरुवातील भाजपातील काही स्थानिक लोकांनी विरोध केला होता. परंतु भाजपने पुन्हा निंबाळकरांवर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी 2019 ला मोदी लाटेत भाजपा प्रवेश केला होता. त्यांनी निंबाळकरांचे काम करत त्यांना निवडून दिले. निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहितेंनी विरोध केला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधे मोहितेंनी प्रवेश करत तिकीट मिळविले आहे. मोहित कुटुंबाने सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे उमेदवार निंबाळकर व इतर जण करू लागले आहेत.
रणजिसिंह निंबाळकरांसाठी सकारात्मक मुद्दे-
खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने अनेक विकासकामे माढा येथे केली आहेत. उदा. माढा येथे अत्यंत पाणी टंचाई होती, तिथे त्यांनी पाणी आणले. माढा मतदारसंघातील अनेक पाणीटंचाईचे प्रश्न निंबाळकरांना सोडले आहेत.
2014 ला मोदी लाटेत महायुतीचे सदाभाऊ खोत निवडून आले असते पण त्यांनी भाजपाचे समर्थन असूनही कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला आणि शिट्टी चिन्ह घेतले. लोकांना इव्हिएमवर कमळ चिन्ह मिळाले नाही त्यामुळे ते पडले आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. यात मतदारांची चूक नव्हती. भाजपाचे सध्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे नाव लोकांत चांगले असल्याचे भाजपचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. माढामध्ये रोजगार वाढवायला एमआयडीसी देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहेय. त्याचा मतदानामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले त्या क्षेत्रात एमआयडीसी आणण्यासाठी केंद्र सरकारच्या संपर्कात होते. परंतु तो विषय का थांबला आहे हा विषय अस्पष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम म्हाळशिरस आणि अकलूज क्षेत्रात मोठे आहे. नीरा नरसिंहपुर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुलदैवत आहे. त्यामुळे ते तिथे जात असतात. आमदार प्रसाद लाड नुकतेच तिथे जाऊन आले. तिथे नीरा भीमा संगम आहे. त्यावर बंधारा बांधण्याचे काम चालू आहे, तिथे पर्यटन स्थळ विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
धैर्यशील मोहितेंच्या बाजूचे आणि अडचणीचे मुद्दे-माढा येथील पूर्ण सहकारक्षेत्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताब्यात आहे. त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळतो. माढा येथून शरद पवार 2009 साली खासदार होते, त्यांनी पुढील आश्वासने माढा येथील जनतेला दिली होती, जे त्यांनी कधी पूर्ण केले नाहीत. माढाला बारामतीसारखे विकसित करेल. माढाला मोठी एमआयडीसी आणतील. एमआयडीसीमधून युवकांना मोठा रोजगार देणार, माढाला पाणी आणतील, अशा अपेक्षा मतदारांच्या होत्या. पण शरद पवार यांनी हे पूर्णपणे खोटे ठरविल्याचा आरोप निंंबाळकर यांनी जाहीर सभेत केला आहे.
सहकार संपविला-माढा हा शुगर बेल्ट आहे, म्हणून येथील सहकार मजबूत होते, परंतु धैर्यशील मोहिते पाटील परिवाराच्या भ्रष्टाचाराने येथील सहकार क्षेत्र संपल्यात जमा आहे. तर धैर्यशील मोहितेंवर भ्रष्टाचाराचे आरोपही भाजपकडून केले जात आहे. सुमित्रा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था धैर्यशील मोहिते पाटील यांनी 300 कोटीचा भ्रष्टाचार करून संपवली, सामान्य नागरिकांच्या ठेवी गिळल्या, ठेवीदार बरबाद झाले, असा राजकीय आरोप आता त्यांच्यावर होत आहेत.
विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्था धैर्यशील मोहिते पाटील यांनी 150 कोटीचा भ्रष्टाचार करून संपवली, सामान्य नागरिकांच्या ठेवी गिळल्या, ठेवीदार बरबाद झाले.
विजय साखर कारखाना, करकंब (पंढरपूर) आणि शिवरत्न साखर कारखाना, आळेगाव ( माढा) या दोन्ही कारखान्यात भ्रष्टाचार करून त्यांना कर्जबाजारी बनवले. त्यातून येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडवले. शेतकरी धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या नाराज आहेत. शिवामृत सहकारी दूध उत्पादक संघात प्रचंड भ्रष्टाचार करून तो डबघाईला आणला. विजयरत्न पशुपक्षी सहकारी संघात प्रचंड भ्रष्टाचार करून तो बुडीत काढला. राजहंस कुक्कुटपालन संघ भ्रष्टाचार करून तो बुडीत काढला,असा आरोप निंबाळकर यांनी कालच झालेल्या जाहीर सभेत केला आहे.
जमिनी बळकाविल्याचाही आरोप-धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज क्षेत्रात गरीब शेतकऱ्यांवर प्रचंड दबाव आणून त्यांच्या जमिनी कमी भावात बळकवतात आणि त्याचे प्लोटिंग करून प्रचंड पैसा कमावतात. शेतकरी स्वतःचे प्लाटिंग करत असल्यास त्याला शासकीय परवानिगी मिळू देत नाहीत. प्रचंड पैसा ते यातून कमावत आहेत. डॉक्टर लॉबी, प्रतिष्ठित व्यावसायिक, व्यापारी यांच्याकडून निवडणूक फंड म्हणून प्रोटेक्शन मनी घेतात,असाही आरोप होत आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे शासकीय अनुदान असलेले पहिली ते बारावी असे सदाशिवराव माने विद्यालय आहे. शासकीय अनुदान असूनही त्यात पहिली, पाचवी, अकरावीलाला प्रवेश घेण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांकडून ते 15000 रुपये अवैध डोनेशन घेतात. हे सर्व बिना पावती बेनामी चालते, असाही आरोप त्यांच्यावर भाजपचे नेते करू लागले आहेत. अकलूज नगरपरिषद येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी हे त्यांच्या दबावात काम करतात अशी स्थानिक लोकांची तक्रार असल्याचे निंबाळकर यांनी अकलुजच्या जाहीर सभेत सांगितला. त्या तुलनेत भाजपाचे रणजितनाईक निंबाळकर यांची प्रतिमा स्वच्छ आहे, असा प्रचार आता भाजपकडून केला जात आहे.