रणजितसिंहांचा पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार; धैर्यशील मोहितेंच्या बंडाने फडणवीस नाराज
Devendra Fadanvis displeased to Ranjitsinh Mohite due to Rebellion Dhairshil Mohite : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू आहे. रविवारी ( 28 एप्रिल ) अकलूजमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी धैर्यशील मोहितेंच्या बंडाने नाराज असलेल्या फडणवीसांनी रणजितसिंह मोहिते पाटलांचा ( Ranjitsinh Mohite ) पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला.
नेमकं काय घडलं?
रविवारी ( 28 एप्रिल ) अकलूजमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी अकलूजमधील शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयासमोर रणजितसिंह मोहिते-पाटील हे काही कार्यकर्त्यांसह उभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यामुळे पोलिसांनी पायलट गाडी थांबवली. मात्र फडणवीस यांनी चालकाला पुढे जाण्यासाठी खुणावलं त्यामुळे फडणवीस हे रणजितसिंह यांचा पुष्पगुच्छ न स्वीकारताच सभेसाठी रवाना झाले. त्यामुळे फडणवीस रणजितसिंहांवर नाराज असल्याचे चर्चांना उधाण आले.
BMCM ची’ जादू ओसरली! 18 व्या दिवशी केली केवळ इतकी कमाई, ‘मैदान’ची अवस्था तर आणखी बिकट
तर फडणवीस यांच्या या नाराजीचे कारण म्हणजे रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबातील धैर्यशील मोहिते-पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु भाजपने त्यांच्या ऐवजी विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिलं. त्यामुळे धैर्यशील मोहिते यांनी बंड करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माढ्यातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला.
ज्या पोपटांना मोठं केलं, त्यांनी विश्वासघात केला, त्यांचा सत्यानाश होणार; फडणवीसांचा हल्लाबोल
मात्र दुसरीकडे रणजीत सिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार असून अद्यापही भाजपमध्येच आहेत. तसेच ते बंड केलेल्या धैर्यशील मोहिते यांच्या प्रचार सभांमध्ये दिसत नसले तरी देखील ते भाजपमध्ये असूनही रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारांमध्ये देखील दिसत नाहीये. त्यामुळे याच नाराजीतून फडणवीसांनी रणजितसिंह मोहिते पाटलांचा पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला.
दरम्यान कालच्या सभेत फडणवीसांनी मोहिते पाटील कुटुंबावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, तुम्ही कितीही विश्वासघात केला तरी लोकांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ज्यावेळी शरद पवारांनी यांच राजकारण संपवण्याचा घाट घातला होता तेव्हा आम्ही यांना साथ दिली. फक्त साथच दिली नाही तर यांचं राजकीय पुनर्वसन केलं आणि आणखी काय काय केलं हे मी इथ उगाळणार नाही. परतु, हे करूनही यांनी विश्वासघात केला असंही फडणवीस यावेळी म्हणाले. तसंच, ज्या लोकांनी आजपर्यंत पाणी अडवलं त्यांना आपण निवडून देणार का? असा प्रश्नही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.