भावना गवळी बहीणच, मला समजून घेईल; राजश्री पाटलांनी व्यक्त केला विश्वास

  • Written By: Last Updated:
भावना गवळी बहीणच, मला समजून घेईल; राजश्री पाटलांनी व्यक्त केला विश्वास

Rajshree Patil on Bhavana Gawali : यवतमाळ-वाशीम लोकसभा (Yavatmal-Washim Lok Sabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या जागी शिंदे गटाने राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे भावना गवळी प्रचंड नाराज आहेत. काल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भावना गवळींनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मी मतदारसंघावरील दावा अजून सोडला नाही. मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर आता राजश्री पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजश्री पाटील यांनी माध्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भावना गवळींविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, भावना गवळी महायुतीच्या मोठ्या नेत्या आहेत. त्या माझ्यासाठी मोठ्या मार्गदर्शिका आहेत. माझ्या मोठ्या बहिण आहेत. एक लहान बहीण म्हणून त्या मला समजून घेतील. मला त्यांचे सहकार्य निश्चित मिळेल, असा विश्वास राजश्री पाटील यांनी व्यक्त केला.

अडचणीच्या काळात साथ देणारा ‘माधव’ पॅटर्न : भाजपचा हुकमी एक्का पुन्हा चर्चेत… 

महाविकास आघाडीतून संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळं आता वाशिम यवतमाळमध्ये संजय देशमुख विरुध्द राजश्री पाटील अशी लढत होणार आहे. याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, संजय देशमुख विरुध्द राजश्री पाटील अशी ही लढतच नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला विश्वगुरू बनवण्यासाठीची ही लढाई आहे. कुठलाही चेहरा-मोहरा नसेलेल्या, अजेंडा नसलेले काही लोकांविरोधात ही लढाई आहे. जगाचं नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यासाठीची ही लढाई असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, राजश्री पाटील यांनी अर्ज भरतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संजय राठोड, मदन येरावार, दादा भुसे आदी आमदार उपस्थित होते. मात्र, नामांकनाच्या वेळी भावना गवळीही अनुपस्थित होत्या. त्यामुळं गवळी यांची नाराजी कायम असल्याचं दिसतं.

राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. भावना गवळींनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. असं वक्तव्य करून त्यांनी एकप्रकारे भावना गवळींना गोंजारण्याचा प्रयत्न केला. यावर आता भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज