‘…तरीही उमेदवारी अर्ज दाखल करणार, दावेदारी सोडली नाही’, तिकीट कापल्यानंतर भावना गवळी आक्रमक

  • Written By: Last Updated:
‘…तरीही उमेदवारी अर्ज दाखल करणार, दावेदारी सोडली नाही’, तिकीट कापल्यानंतर भावना गवळी आक्रमक

Bhavana Gawali on Rajashri Patil : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) अर्ज भरायला एक दिवस बाकी असतांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या जागी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, उमदेवारी न मिळाल्याने भावना गवळी आक्रमक झाल्या आहेत. उमेदवारी नाकारली तरीही मी अर्ज दाखल करणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला.

भावना गवळी अन् हेमंत पाटलांचा पत्ता कट; CM शिंदेंनी उमेदवार बदलला 

भावना गवळींचं तिकीट कापून संजय राठोडांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, पक्षाने गवळी आणि राठोडांना नाकारून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. याविषयी बोलतांना गवळी म्हणाल्या की, सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो. पण, मी गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ वाशीममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळं मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते. मी अद्याप यवतमाळ-वाशीम मतदारसंघावरील दावेदारी सोडलेली नसल्याचं त्या म्हणाल्या.

महादेव जानकरांचे पुतणे लोकसभेच्या रिंगणात, माढ्यातून निवडणूक लढणार असल्याची केली घोषणा 

पुढं बोलतांना त्या म्हणाल्या, मी आता माझ्या मतदारसंघात परतणार आहे. आणि यवतमाळ-वाशीममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असं भावना गवळी म्हणाल्या. त्यामुळे आता महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्री पाटील यांच्याविरोधात भावना गवळी बंडखोरी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

दरम्यान, भावना गवळींनी उमेदवारी मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. त्यांनी उमेदवारी संदर्भात फडणवीसांशी चर्चा केली होती. हा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. मात्र, शिंदे गटाने राजश्री पाटील यांना उमदेवारी दिली. त्यामुळं भावना गवळी यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.

यवतमाळ-वाशीममधून ठाकरे गटाने संजय देशमुख यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख अशी लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज