भावना गवळी अन् हेमंत पाटलांचा पत्ता कट; CM शिंदेंनी उमेदवार बदलला

भावना गवळी अन् हेमंत पाटलांचा पत्ता कट; CM शिंदेंनी उमेदवार बदलला

Hingoli & Washim-Yavatmal Loksabha : हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha) मतदारसंघातून शिंदे गटाकडून बाबुराव कदम कोहळीकर (Baburao kadam Kohlikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हिंगोलीच्या विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिंदेंच्या निर्णयामुळे त्यांच्यावर उमेदवार बदलण्याची वेळी आली असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘उत्तर देऊ शकत होतो पण..,’; आंबेडकरांच्या आरोपांवर ठाकरे पहिल्यांदाच बोलले

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वचे पक्षांकडून उमेदवारांची याद्या जाहीर करण्यात येत आहेत. अशातच उमेदवारीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये घमासान सुरु आहे. त्यातच आता महायुतीमध्येही शिवसेनेवर दबाव टाकला जात असल्याचं समोर येत आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती. आता ही उमेदवारी रद्द करुन नवीन चेहऱ्याला शिंदेंनी संधी दिली आहे.

Sujay Vikhe : जिल्ह्याबाहेरील व्यक्तीवर काय बोलायचं? सुजय विखेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

हिंगोलीसारखीच अवस्था वाशिम यवतमाळमध्येही झाल्याचं दिसून येत आहे. या मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून शिंदे गटाच्या भावना गवळी विद्यमान खासदार आहेत. त्यांचंही तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

हिंगोलीत हेमंत पाटील यांच्यावर अनेक मतदारांकडून नाराजी व्यक्त होत असल्याची परिस्थिती दिसून येत होती. त्यामुळेत त्यांच्याऐवजी आता बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वाशिम यवतमाळमध्ये भावना गवळींना उमेदवारी जाहीर न झाल्यास आम्ही पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा शिंदेंच्या शिवसैनिकांनी दिला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज