इंडिया आघाडीचे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने, त्यात तुम्हाला जागा नाही…; फडणवीसांचे टीकास्त्र

इंडिया आघाडीचे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने, त्यात तुम्हाला जागा नाही…; फडणवीसांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis on India Alliance : महायुतीचे (Mahayuti) हिंगोलीचे महायुतीचे (Mahayuti) उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीवर (Baburao Kadam Kohlikar) जोरदार टीका केली. विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, त्यात तुम्हाला बसायला जागा नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, म्हणाले मी बोललो तर… 

फडणवीसांनी आदिवासी भाषेत आणि बंजारा भाषेत भाजपची सुरूवात करून उपस्थितांची मनं जिंकली. ते म्हणाले, प्रभू श्रीरामचंद्राच्या हातात धनुष्यबाण आहे. बाबुरावांच्या हातीही धनुष्यबाण आहे. मोदींचं चिन्ह काय आहे, तर तेही धनुष्यबाण. बिरसा मुंडांच्या हातातही धनुष्यबाण आहे. मग तुम्हीही धनुष्यबाण असलेल्या उमेदवारालाच विजयी करा, असं आवाहन फडणवीसांनी केलं.

ब्रेकिंग न्यूज: मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाला मोठी आग 

ते म्हणाले, ही निवडणुक ग्रामपंचाय, नगरपरिषद, विधानसभेची निवडणूक नाही. तर ही लोकसभेची निवडणूक आहे. पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात देश द्यायया हे ठरवणारी निवडणूक आहे. विश्वगुरू नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट), मनसे, रासपा आणि इतरही घटक पक्ष आहेत. आणि तर दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्र आले आहेत. एकीकडे मोदींची विकासाची ट्रेन आहे. त्या ट्रेनला मोदींचं इंजिन आहे. त्याला वेगगवेळ्या पक्षांच्या बोग्या लागल्या आहेत. त्या डब्यात शेतकरी, मजूर, ओबीसी, अल्पसंख्यांक अशा प्रत्येक माणसाला बसायला जागा आहे. तुम्हीही कोहळीकरांची बोगी मोदींच्या ट्रेनला लावली तर अख्खी हिंगोली त्यात बसेल आणि विकासाच्या दिशेने पुढं झाली, असं फडणवीस म्हणाले.

तर राहुल गांधींच्या ट्रेनला फक्त इंजिन आहे. त्याला डबे-बोग्या जोडलेल्याच नाही. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, मी इंजिन आहे. लालू म्हणतात, मी इंजिन आहे, ममता दिदी म्हणतात मी इंजिन आहे. स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे. हे इंजिन प्रत्येकजण ओढत आहे. कुणी मुंबईकडे ओढतंय तर कुणी बारामतीकडे ओढतयतं, त्यामुळं त्यांचं इंजिन जागेवरून हलतही नाही, चालतही, नाही. ते ठप्प पडलेलं इंजिन आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

फडणवीस म्हणाले, इंजिनमध्ये फार फार ड्रायव्हर बसू शकतो आणि ड्रायव्हरचा परिवार बसू शकतो. माझं कुटुंब, माझी जबाबदारी यांच्या पलीकडे विरोधकांच्या इंजिनमध्ये तुम्हाला जागा नाही. राहुल गांधींच्या ट्रेनमध्ये सोनिया आणि प्रियंकाजींना जागा आहे. ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना आणि शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे. त्यांच्या इंजिनमध्ये तुम्हाला जागा नाही, असंही फडणवीस म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube