अर्चना पाटलांसाठी महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल
Dharashiv Lok Sabha : धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या (Dharashiv Lok Sabha) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अर्चना पाटलांना विजयी करण्याचा निर्धार केला.
Kiran Rao: आमिर खानसोबतच्या घटस्फोटाविषयी अभिनेत्री थेटच म्हणाली, ‘आम्हाला आमच्या नात्याची… ‘
माझा विजय पक्का
महायुतीतर्फे अर्चना पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेला संबोधित करतांना त्या म्हणाल्या की, धाराशिवची लोकसभा निवडणूक अर्जना पाटील विरूध्द अन्य पक्षाचा उमेदवार अशी नाही. तर ही निवडणूक मोदी विरुध्द राहुल गांधी अशी आहे. मोदींनी चारशे पारचा नारा दिला. त्यांनी त्यांच्या 399 जागा निवडूण आणण्यासाठी जुगाड लावलं. 400 वी मी उमेदवार आहे. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने जमले की, मला माझा विजय पक्का वाटत आहे, असं म्हणाल्या.
‘पवार साहेब हाच का तुमचा पुरोगामीपणा?’ राम मंदिरावरील वक्तव्यानंतर भाजपाने विचारला तिखट सवाल
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राणा जगजितसिंह, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे उपस्थित होते.
राणा जगजितसिंह म्हणाले की, ही निवडणूक लोकसभेची आहे. खासदाराचं काम असतं केंद्राकडून योजना आणणं, निधी आणणं. पण, गेल्या पाच वर्षात उस्मानाबादला न्याय मिळाला नाही, अशी टीका त्यांनी नाव न घेता ओमराजेंवर केली. ते म्हणाले, आता महायुतीचाच खासदार निवडूण येईल आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. मोदींच्या नेतृत्वात पुढचं विकासाचं पर्व गतिमान होणार आहे. महायुतीचे उमेदार मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावतील, असं राणा जगजितसिंह म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. ही निवडणूक गावकी भावकीची नाही. पुढचे पाच वर्ष देश कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निडणूक आहे. त्यामुळं ही निवडणूक हलक्यात घेऊन मतदान करू नका, असं अजित पवार म्हणाले.
अर्चना पाटलांना मताधिक्याने विजयी करणार
या मतदारसंघातून शिवसेनेचा सात वेळा खासदार झाला आहे. हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र, ही जागा शिवसेनेच्या हातून गेल्याचं दु:ख आहेच, पण ते विसरून शिवसैनिक अर्चना पाटलांना लीड मिळवून देतील, असा विश्वास तानाजी पाटलांनी व्यक्त केला.