Loksabha Election : माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला; अर्चना पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं

  • Written By: Published:
Loksabha Election : माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला; अर्चना पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं

Dharashiv Lok Sabha Constituency candidate Archana Patil: धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) या आहेत. त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. माझा नवरा भाजपचा खासदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, असे त्यांचे व्यक्तव्य दिवसभर चर्चेत आले होते. परंतु आता त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

फरार उद्योगपती विनोद खुटेंप्रकरणी ईडी अहमदनगरमध्ये मोठी कारवाई; कोट्यवधींची मलमत्ता जप्त

‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. प्रसारित केलेली माझी प्रतिक्रिया तोडून-मोडून दाखवली गेली आहे, असे अर्चना पाटील यांचे म्हणणे आहे. ज्या मतदारसंघात आमचे महायुतीचे सहकारी आमदार आहेत. तिथे वर्चस्व वाढवण्याबाबत मला प्रश्न विचारला होता. त्यावर ‘मी महायुतीची उमेदवार असताना आणि राजाभाऊसारखा भाऊ खंबीरपणे माझ्या पाठिशी असताना तिथे माझं वर्चस्व त्या मतदारसंघात का वाढवू असे मी म्हणाले.

“होय, मी भाजपात प्रवेश करणार”, नाथाभाऊंनी अगदी ठासूनच सांगितलं

माझ्या उत्तराला अर्धवट तोडून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आणि चुकीच्या पद्धतीने ते मांडले गेले, असेही अर्चना पाटील यांचे स्पष्ट केले आहे. मी राष्ट्रवादीची आणि पर्यायाने महायुतीची उमेदवार आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींजींना पंतप्रधान करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube