Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार अन् पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार; निंबाळकर VS पाटलांमध्ये लढत

Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार अन् पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार; निंबाळकर VS पाटलांमध्ये लढत

Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार आणि पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार, अशीच परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Loksabha) पाहायला मिळत आहे. धाराशिववरुन रस्सीखेच सुरु असतानाच अखेर अजित पवार गटाकडे (Ncp Ajit Pawar Group) ही जागा गेलीयं. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकरांविरोधात (Omraje Nimbalkar) महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा

मागील अनेक दिवसांपासून महायुतीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन रणकंदन सुरु असल्याचं दिसून येत होतं. राज्यातील सात जागांसाठी अजित पवार गट आग्रही होतं. यामध्ये धाराशिवचाही समावेश होता. अखेर महायुतीकडून धाराशिवची जागा मिळताच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

उन्मेष पाटलांचा पक्षप्रवेश… भाजप अन् शिंदेंना धक्का देत ठाकरेंनी सेट केलं जळगावचं गणित

अर्चना पाटील या ‘घड्याळ’ निवडणूक चिन्हावरून निवडणूक लढविणार असल्याचे चर्चा सुरू होती. अखेर अर्चना पाटलांना आज दुपारी ३ वाजता अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलतांना तटकरेंनी म्हणाले की, महायुतीच्या जागावाटपात धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षा म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना पाटील या आमच्या लोकसभेच्या उमेदवारी आहे. महायुतीच्या उमेदवाराचा एकसंघपणे घोषणा ही पहिल्यांदाच होत आहे. याआधी प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले. मात्र धाराशिवच्या बाबतीत वेगळेच चित्र पाहायला मिळते, असं तटकरे म्हणाले.

धाराशिव मतदारसंघातील भाजपचे आमदार, शिवसेनेचे आमदार, शिक्षक पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा करणार आहे. धाराशिवमध्ये अर्चना पाटील मोठ्या फरकाने विजयी होतील, असं तटकरे म्हणाले. दरम्यान, धाराशिवमध्ये महाविकास आघाडीने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांना उमदेवारी दिली आहे. आता महायुतीने अर्चना पाटील यांच्यारुपाने उमेदवार दिला. त्यामुळं धाराशिमध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांच्यात लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज