मोठी बातमी! अखेर एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार, संध्याकाळपर्यंत ठरणार पक्षप्रवेशाचा मुहूर्त
Eknath Khadse Will Join BJP : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये (BJP) परतणार अससल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता खडसे यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. आज सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती आहे. खडसे सोबत आल्यास भाजपला उत्तर महाराष्ट्रातील जागांवर उमेदवारांना निवडणून आणण्यास मदत होईल.
मोठी बातमी! अखेर एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार, संध्याकाळपर्यंत ठरणार पक्षप्रवेशाचा मुहूर्त
एकनाथ खडसे यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये काम केले आहे. मात्र काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला होता. यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, अलीकडच्या काळात खडसे यांनी भाजपमध्ये यावे म्हणून दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या. विशेषत: राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजल्या जातं. खडसेंच्या संभाव्या प्रवेशामुळंच रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्याची चर्चा आहे.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ प्रभासच्या ‘बाहुबली 2’चा हा विक्रम मोडेल का? कोण करेल ऐतिहासिक कमाई
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार खडसे हे भाजपमध्ये यावेत यासाठी राज्यातील नेते तसचे केंद्रातील नेते त्यांना विनंती करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
खडसे हे सध्या शरद पवार गटाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.
दरम्यान, काही दिवसांपासून खडसे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, गिरीश महाजन यांनी त्याला सातत्याने नकार दिला होता. मात्र, आता खडसे हे पुन्हा भाजपवासी होणार असल्याची माहीती आहे. त्यामुळं आता गिरीश महाजन यांची चांगलीच अडचण होणार आहे.