फरार उद्योगपती विनोद खुटेंप्रकरणी ईडी अहमदनगरमध्ये मोठी कारवाई; कोट्यवधींची मलमत्ता जप्त

फरार उद्योगपती विनोद खुटेंप्रकरणी ईडी अहमदनगरमध्ये मोठी कारवाई; कोट्यवधींची मलमत्ता जप्त

ED Action in Ahmednagar : देशभरात विविध प्रकरणी कारवाईचा बडगा उगारणाऱ्या सक्त वसुली संचलनालयाने ( ED ) आता थेट अहमदनगरमध्ये ( Ahmednagar ) फरार उद्योगपती विनोद खुटेंची ( Vinod Khute ) कोट्यवधींची मलमत्ता जप्त करत कारवाई केली आहे. मल्टी लेव्हल मार्केटींगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

“होय, मी भाजपात प्रवेश करणार”, नाथाभाऊंनी अगदी ठासूनच सांगितलं

उद्योगपती विनोद खुटे हे मूळ नगर जिल्ह्यातील आहेत. मात्र सध्या ते दुबईत राहत आहेत. मल्टी लेव्हल मार्केटींगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणी त्यांच्यावर तब्बल 125 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता वसुली संचलनालयाने थेट त्यांच्या संबंधित व्हिआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजची पुणे आणि नगर जिल्ह्यातील मालमत्ती जप्त केली आहे.

सांगलीत चंद्रहार पाटीलच अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात मैत्रीपूर्ण लढती; राऊतांचा कॉंग्रेसला इशारा

यामध्ये ईडीने व्हिआयपीएस ग्रुप व ग्लोबल अॅफिलिएट बिझिनेस कंपनी या खुटे यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित कंपनीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यात पुण्यात 366.92 चौरस मीटरचे पाच निवासी सदनिका, 139.39 चौरस मीटरचे दोन बहुउद्देशिय हॉल, 366.92 चौरस मीटरच्या दोन कार्यालयीन जागा जमीन. तर अहमदनगरमध्ये 8.98 कोटींती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर आता पर्यंत या प्रकरणी ईडीने 70.89 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

तर खुटे यांच्या व्हिआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजकडकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि बेकायदेशीर व्यवहार करण्यात आले आहेत. तर पुण्यात त्यांनी धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी केली होती. त्यात गुंतवणूकदारांना जास्त व्याजा्चटा अमिष दाखवून मिळालेली रक्कम हवाला आणि शेल कंपन्यांद्वारे देशा बाहेर पाठवली. असे आरोप खुटे यांच्यावर आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube