“होय, मी भाजपात प्रवेश करणार”, नाथाभाऊंनी अगदी ठासूनच सांगितलं

“होय, मी भाजपात प्रवेश करणार”, नाथाभाऊंनी अगदी ठासूनच सांगितलं

Eknath Khadse : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन मी भाजपात प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची (JP Nadda) भेट घेतली. भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भारतीय जनता पार्टीत मी प्रवेश करणार आहे. येत्या पंधरा दिवसांत हा पक्षप्रवेश व्हावा यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Eknath Khadse : ‘आशीर्वाद कामी आले, सुखरूप बरा झालो’ नाथाभाऊंनी सांगितला आजारपणातील अनुभव

चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे, असे पत्रकारांनी विचारल्यावर खडसे म्हणाले, चंद्रपुरातील सभेत माझा पक्ष प्रवेश होणार नाही. माझा भाजप प्रवेश हा दिल्लीत होणार आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून ज्या दिवशी मला बोलावण्यात येईल त्यादिवशी दिल्लीतच माझा प्रवेश होईल.

भाजपमध्ये येण्यासाठी मी कधीच प्रयत्न करत नव्हतो. पण भाजपाचे जे जुने नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करताना तुम्ही भाजपात असायला पाहिजे होतं. तुम्ही आलात तर बरं होईल अशी चर्चा वरिष्ठ पातळीवरील नेत्यांत होती. ही चर्चा काही आजपासून सुरू नाही तर मागील चार ते पाच महिन्यांपासून सुरू आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

मोठी बातमी! अखेर एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार, संध्याकाळपर्यंत ठरणार पक्षप्रवेशाचा मुहूर्त 

एकनाथ खडसे यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये काम केले आहे. मात्र काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला होता. यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, अलीकडच्या काळात खडसे यांनी भाजपमध्ये यावे म्हणून दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या. विशेषत: राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजल्या जातं. खडसेंच्या संभाव्य प्रवेशामुळंच रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्याची चर्चा आहे.

खडसे हे भाजपमध्ये यावेत यासाठी राज्यातील नेते तसचे केंद्रातील नेते त्यांना विनंती करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खडसे हे सध्या शरद पवार गटाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज