Eknath Khadse : ‘आशीर्वाद कामी आले, सुखरूप बरा झालो’; नाथाभाऊंनी सांगितला आजारपणातील अनुभव

Eknath Khadse : ‘आशीर्वाद कामी आले, सुखरूप बरा झालो’; नाथाभाऊंनी सांगितला आजारपणातील अनुभव

Eknath Khadse : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले. त्यामुळे खडसे या मोठ्या धक्क्यातून सुखरूपपणे बाहेर आले. यानंतर खडसे आता जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या कोथळी निवासस्थानी आले. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  यावेळी खडसे यांनी हृदयविकाराच्या धक्क्याचा अनुभव सांगितला आणि संत मुक्ताई आणि अनेकांचे आशीर्वाद पाठिशी असल्याने या आजारपणातून बरे झाल्याचे सांगितले.

मधल्या कालखंडात मला हृदयविकाराचा झटका आला होता. हा कार्डियाक अॅटॅक होता. अशा प्रकाराच्या धक्क्यातून बरं होणं सहसा शक्य नसतं. यावेळी शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका स्ट्रेचरवरून दुसऱ्या स्ट्रेचरवर हलवण्यात येत होतं त्याच ठिकाणी हा अटॅक आला. मात्र, या रुग्णालयात सर्व व्यवस्था होती. त्यामुळे तातडीने उपचार करता आले. त्यानंतर शॉक ट्रिटमेंट देऊन बंद पडलेली हृदयाची प्रक्रिया सुरू करता आली. एक नवजीवन मला त्या माध्यमातून मिळालं असं मला वाटतं. अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत. मुक्ताईंचा आशीर्वाद आहे म्हणून या आजारपणातून बाहेर आलो, असे खडसे म्हणाले.

Eknath Shinde : ‘उबाठा’च्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक ‘त्या’ घटनेनंतर CM शिंदेंकडून उद्धव ठाकरे टार्गेट

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर परत येईल की नाही याची खात्री नव्हती. पण, मुक्ताईंचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत. तसेच राज्यातील जनतेच्या शुभेच्छाही माझ्या बरोबर होत्या. अनेकांचे आशीर्वाद असल्यानेच मी या कार्डियाटिक अॅरेस्टमधून बाहेर आलो, असे खडसे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या छातीत दुखत होते. यानंतर त्यांना जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी खडसेंच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यासं समोर आलं. यानंतर त्यांना हवाई अॅम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आलं. मुंबईतील रुग्णालयात व्यवस्थित उपचार करण्यात आले. त्यामुळे या गंभीर अशा हृदयविकाराच्या धक्क्यातून खडसे यांना सावरता आले. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ एअर अॅम्ब्यूलन्स पाठविण्याचे आदेश दिले होते.  तातडीने कार्यवाही करण्यात आल्याने खडसेंना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.  बॉम्बे रुग्णालयात त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या.

प्रसंग कोणताही असो, लवकरच बरा होऊन..; एकनाथ खडसेंची थेट हॉस्पिटलमधून पोस्ट

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube