Eknath Shinde : ‘उबाठा’च्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक’.. ‘त्या’ घटनेनंतर CM शिंदेंकडून उद्धव ठाकरे टार्गेट

Eknath Shinde : ‘उबाठा’च्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक’.. ‘त्या’ घटनेनंतर CM शिंदेंकडून उद्धव ठाकरे टार्गेट

Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी तेथे आले. मुख्यमंत्री शिंदे स्मृतिस्थळाला भेट देऊन गेल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला. धक्काबुक्कीचीही घटना घडली. यानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकारावर भाष्ट करत ठाकरे गटाला फैलावर घेतले आहे.

शिंदे म्हणाले, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. कारण बाळासाहेबांचा स्मृतीदिन शांततेत साजरा होतो. राज्यातून कार्यकर्ते येतात. नतमस्तक होतात आणि आपापल्या गावी निघून जातात. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष नको, स्मृतीदिनाला गालबोट लागू नये म्हणून मी, आमदार, खासदार शांतपणे स्मृतीस्थळी नतमस्तक झालो. दर्शन घेतलं आणि आम्ही निघून गेलो इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी निघत असताना उबाठाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणं, घोषणाबाजी करणं, महिलांना धक्काबुक्की करणं ही बाब अतिशय निंदनीय आहे.

CM Eknath Shinde : काहींच्या पोटात दुखतं, त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी कोणताही वाद नको, गालबोट लागायला नको म्हणून समंजसपणाची भूमिका घेत मुख्यमंत्री पूर्वसंध्येला दर्शन घ्यायला जातात. त्यामुळे आज ठाकरे गटाने तिथे दाखल होऊन वाद घालण्याची कोणतीही गरज नव्हती.परंतु, बाळासाहेबांना आपण गमावलंय या भीतीपोटी ते कोणत्याही थराला जात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती.

नेमकं काय घडलं ?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11 वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक दर्शनासाठी येतात. काल संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी तेथे हजर असलेले ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. मुख्यमंत्री शिंदे तेथून बाहेर पडल्यानंतर आणखी काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. विशेष म्हणजे ठाकरे गटाते अनिल परब आणि सुभाष देसाई यांच्यासह ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते शिवतीर्थावर आले होते. त्यांनी स्मारकाच्या ठिकाणी शु्द्धीकरण केल्याचे सांगितले जात आहे. यावरून दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली. यानंतर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

Eknath Shinde यांचे मुख्यमंत्रीपद हिवाळी अधिवेशनापूर्वी जाऊ शकते!, शरद पवार गटाचा दावा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube